मुख्यमंत्री शिंदे यांना धमकी देणारा गजाआड

आरोपी अटकेत

840

News34 chandrapur

मुंबई/पुणे – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना उडविणार असल्याची धमकी हेल्पलाईन क्रमांक 112 वर देण्यात आली होती, त्यानंतर मुंबई पोलिसांनी याबाबत गंभीर दखल घेत तपास सुरू केला असता पोलिसांनी फोन करणाऱ्या व्यक्तीला अटक केली आहे.

मी एकनाथ शिंदे यांना उडविणार असल्याचा धमकीवजा कॉल आज एकाने हेल्पलाईन क्रमांक 112 वर केला त्यानंतर पोलीस तपासकामाला लागले, पुण्यातील वारजे भागातून सदर कॉल आला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

पोलिसांनी फोन करनाऱ्यांचे लोकेशन ट्रेस करण्यात आले असता पुणे पोलिसांनी त्या इसमाला अटक केली, धमकी देणारा मुंबई भागातील धारावी येथे राहणारा होता, त्याने दारूच्या नशेत कॉल केला असल्याचे यावेळी तपासात निष्पन्न झाले.

राजेश आगवणे असे त्या आरोपीचे नाव आहे, राजेशच्या कॉल नंतर मुंबई पोलीस क्राईम ब्रांच व महाराष्ट्र ATS त्याचा शोध घेत होते.

राजेश ला ताब्यात घेतल्यावर पुढील कारवाई सुरू आहे.

bottom