बल्लारपूर गोंदिया मेमु ट्रेन चे चाके पुन्हा थांबले

The wheels of the Ballarpur Gondia MEMU train stopped again

5703

News34 chandrapur

चंद्रपूर – बल्लारशाह येथून गोंदियाकडे जाणारी मेमू ट्रेन 68801 बल्लारशाहहून बाबुपेठ रेल्वे स्थानकामार्गे चांदाफोर्टकडे येत असताना अचानक तांत्रिक बिघाडामुळे बंद पडली, तांत्रिक बिघाड दूर करण्यासाठी 3.5 तासांहून अधिकचा वेळ लागला. यादरम्यान प्रवाशांची अवस्था दयनीय झाली होती. Chanda fort railway

 

काही महिन्यांत तिसऱ्यांदा हा प्रकार घडला आहे. त्यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. एकदा गोंदियाहून येणारी ट्रेन केळझरच्या पुढे थांबली. आणि प्रवासी घनदाट जंगलातून चालत चांदाफोर्टला पोहोचले होते. गेल्या महिन्यात बल्लारशाहला जाण्याऐवजी मध्यरात्री चांदाफोर्ट येथे गाडी थांबविल्याने प्रवाशांना त्रासाला सामोरे जावे लागले होते.  68801 – Balharshah – Gondia Memu

 

मेमू ट्रेन क्र. 68801 ने नेहमीप्रमाणे रविवारी दुपारी 2.15 वाजता बल्लारशाह रेल्वे स्थानक सोडले आणि विसापूर, बाबूपेठ स्थानकावरून चांदाफोर्ट येथे पोहोचणार असताना बाबूपेठ उड्डाणपुलिया जवळील इलेक्ट्रॉनिक वायर आणि इंजिन संपर्क केंद्रात तांत्रिक बिघाड झाल्याने रेल्वेची चाके जाम झाली.

 

बल्लारशाह येथून तंत्रज्ञांना पाचारण करण्यात आले आणि सुमारे साडेतीन तासानंतर गाडी पुढील प्रवासासाठी निघाली. दुपारी 2.45 ला चांदा फोर्टला पोहोचलेली ही ट्रेन 6.20 ला पोहोचली. यादरम्यान उन्हामुळे प्रवाशांची अवस्था दयनीय झाली होती.

 

68801 – Balharshah – Gondia Memu

This train runs between Balharshah Junction (station code BPQ) and Gondia Junction (station code G) in the state of Maharashtra.

  • It is a daily train, which means it runs all seven days of the week.
  • The train departs from Balharshah Junction at 5:20 AM and arrives at Gondia Junction at 9:55 AM. The total journey time is 4 hours and 35 minutes.
  • The train stops at several stations along the way, including Chandrapur, Warora, Hinganghat, and Deori, among others. The exact list of stops may vary depending on the day of the week and the time of year.
  • The train consists of MEMU (Mainline Electric Multiple Unit) coaches, which are designed for short to medium distance travel. These coaches are equipped with comfortable seating, air conditioning, and other amenities to ensure a pleasant journey for passengers.
  • You can check the train schedule, availability, and fares on the Indian Railways website or mobile app, or by visiting a railway ticket booking center.

 

bottom