चंद्रपुरात चिमण्यांसाठी विशेष सुविधा, रहायला घर, खायला अन्न

घरीच तयार केले चिमण्यांसाठी 225 घरटे

891

News34 chandrapur

चंद्रपूर/वरोरा – वाढत्या शहरीकरणामुळे नागरिकांना रहायला घर मिळत असले तर याचा सर्वात जास्त फटका पक्ष्यांना बसत आहे. Sparrows
आधी घरटी बनविण्यासाठी पक्ष्यांना काडी कचरा सहज उपलब्ध व्हायचा मात्र आता ते सुद्धा मिळणे कठीण झाले आहे. Bird lover
मात्र वरोरा शहरातील शिवशंकर यादव यांनी आपल्या घर परिसरात तब्बल 225 घरटी तयार करीत पक्ष्यांना निवारा देण्याचं काम केलं आहे.
आजकाल पक्षीप्रेमी हे समाजमाध्यमांवर जास्त सक्रिय असतात मात्र स्वतः पक्ष्यांसाठी स्वतःच आयुष्य ही पक्ष्यांकरिता जगणारा वरोरा येथील शिवशंकर यांच्या या कार्यामुळे अनेक जण प्रेरणा घेत आहे.
वरोरा शहरातील शिवशंकर यादव हे खाजगी कंपनीत कामाला होते मात्र काही कारणास्तव ती कम्पनी बंद पडल्याने आता त्यांना अर्ध्या पगारावर आपलं कुटुंब चालवावं लागत आहे.
त्यानंतर सुद्धा शिवशंकर हे खचले नाही, शहरात वाढती लोकसंख्या, घराच्या छतावर वाढणारे मोबाईल कंपन्यांचे टॉवर बघता पक्ष्यांना घरटे बांधण्यासाठी पर्याय उरला नाही मात्र शिवशंकर यांनी आपल्या घरी लाकडापासून 225 सुंदर घरटी तयार केल्या आहे.
त्यांच्या या घरट्यात अनेक चिमण्यांनी आपल्या पिल्लांसह बस्तान मांडले आहे. चिमण्यांना पिण्याच्या पाण्याची सोय, दररोज 3 किलो तांदूळ व वर्षभर 120 ब्रेड चा खर्च स्वतःच्या खिशातून यादव करतात, विशेष म्हणजे या कार्यात त्यांच्या कुटुंबाची त्यांना साथ लाभली आहे.
लाकडां पासून पक्ष्यांना एक घरटे बनविण्याचा खर्च जवळपास 450 रुपये आहे, यादव यांनी आपल्या घरी असे 225 घरटे तयार केले, यासाठी त्यांनी कुणाची मदत घेतलेली नाही.
सध्याच्या प्रदूषित वातावरणामध्ये आपला जीव घुसमटतो तर या पक्ष्यांचं काय हाल होत असेल, आपण पक्ष्यांसाठी खूप हळवे आहो, आज मी इथवर पोहचलो मात्र भविष्यात मला या पक्ष्यांसाठी खूप काही करायचं अशी भावना यादव यांनी व्यक्त केली आहे.

 

bottom