चंद्रपूर शहर पोलिसांचे अत्यंत महत्वाचे आवाहन

पोलिसांची शोधमोहीम

7049

News34 chandrapur

चंद्रपूर : नामे उबेदुल्ला ताज बेग यांच्या राहणार कपील चौक, महाकाली कॉलरी, चंद्रपूर यांनी शहर पोलीस स्टेशन, चंद्रपूर येथे दिलेल्या तोंडी तक्रारीवरुन त्यांचा अल्पवयीन मुलगा नामे रेहान उबेदुल्ला बेग वय 16 वर्ष हा मतीमंद व मुका आहे. तो 28 मार्च 2023 रोजी दुपारी एकटाच घरुन निघुन गेला. वार्डातील नागरीकांना फिरतांना आढळुन आल्याने त्याला घरी आणण्याचा प्रयत्न केला परंतु तो पळून गेला. त्याचा सर्व ठिकाणी शोध घेतला असता तो मिळुन आला नाही.

अल्पवयीन मुलास कोणीतरी अज्ञात इसमाने पळवुन नेल्याचे संशयावरुन तोंडी रीपोर्ट दाखल करण्यात आला आहे.
अल्पवयीन मुलगा नामे रेहान उबेदुल्ला बेग याचा याचा पोलीस स्टेशन परीसर, बस स्टॉप, रेल्वे स्टेशन, पडोली, दुर्गापूर, रामनगर, बंगाली कॅम्प, मुल रोड परीसर, बल्लारपूर, घुग्घुस, मोरवा, भद्रावती व इतरत्र परीसरात शोध घेतला असता मिळुन आला नाही. City police chandrapur

हरविलेल्या अल्पवयीन मुलाचे वर्णन पुढीलप्रमाणे:
वय 16 वर्ष, उंची 4.8 इंच, चेहरा गोल, रंग सावळा, मध्यम बांधा, केस बारीक, पायात काळया रंगाची फाटलेली चप्पल, अंगात गुलाबी रंगाचा हाफ बाह्याचा टी-शर्ट, निळा जिन्स पँट परीधान केलेला आहे.
सदर वर्णनाचा अल्पवयीन मुलगा आढळुन आल्यास शहर पोलीस स्टेशन, चंद्रपूर येथे माहिती द्यावी असे आवाहन शहर पोलीस स्टेशन, चंद्रपूरच्या वतीने करण्यात आले आहे.

bottom