राष्ट्रभक्तांचा अपमान आम्ही सहन करणार नाही – सुधीर मुनगंटीवार

चंद्रपुरात वीर सावरकर गौरव यात्रा

359

News34 chandrapur गुरू गुरनुले

मुल – स्वातंत्र्य लढयातील धगधगते यज्ञकुंड स्वातंत्र्यवीर विनायक दामोधर सावरकर हे जगातले एकमेव स्वातंत्र्य विर होते त्यांचा अपमान आम्ही सहन करणार नाही. असा इशारा राज्याचे वनमंत्री व मत्स्यव्यवसाय सांस्कृतिक कार्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नाम.सुधीर मुनगंटीवार यांनी काँग्रेसला दिला. तसेच दाढी वाढविल्याने पंतप्रधान बनत नाही. त्याला बुद्धी लागते अशी टीका राहुल गांधी यांचेवर केली. आणि स्पर्धा करायची आहे तर विकासाची करा असा चिमटा काँग्रेसला लावला. Swatantra Veer Savarkar Gaurav Yatra

तसेच काँग्रेस धर्म, जातिय वाद करुन तेढ निर्माण करीत आहे. करीता काँग्रेसला धढा शिकवायला कार्यकर्त्यांनी सज्ज राहावे असा सल्लाही कार्यकर्त्यांना दिला. स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रेचे निमित्त ७ एप्रिल रोजी मूल येथे गांधी चौकात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात मार्गदर्शनातून बोलत होते. गौरव यात्रा इको पार्क पासून गांधी चौकापर्यंत आणण्यात आली. मी सावरकर अशी टोपी परिधान करण्यात आलेले भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते लक्ष वेधून घेत होते. Veer savarkar

नाम.सुधीर मुनगंटीवार यांचे मुल आगमण प्रित्यर्थ भाजपा पदाधिकारी यांनी स्वागत यात्रा समिती मुल तर्फे स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणुन भाजप जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे, भाजपा महिला नेत्या व मुल तालुका अध्यक्ष माजी जिल्हा परिषद अध्यक्षा संध्याताई गुरनुले, माजी न.प.अध्यक्ष रत्नमाला भोयर, भाजप शहर अध्यक्ष प्रभाकर भोयर, माजी उपाध्यक्ष नंदू रणदिवे, भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष तथा बल्लारपूर नगर पालीकेचे माजी अध्यक्ष हरीश शर्मा, मुल पं.स.माजी सभापती चंदू मर्गोंनवार,माजी सदस्य वर्षा लोनबले, माजी न.प.सभापती प्रशांत समर्थ, सदस्य चंद्रकांत आश्टणकर, प्रशांत बोबाटे, अनिल साखरकर, राकेश ठाकरे, सुनील आयलंनवार,मिलिंद खोब्रागडे, महेंद्र करकाडे, प्रवीण मोहुरले, बंडू नर्मलवार, संजय येनुरकर,गुरु भेंडारे, यांचेसह भाजप कार्यकर्ते व महिला कार्यकर्त्या उपस्थित होते. संचालन माजी उपाध्यक्ष प्रवीण मोहुरले यांनी केले. तर आभार शहर अध्यक्ष प्रभाकर भोयर यांनी मानले.

bottom