त्या रात्री काय घडलं? पोलीस उपनिरीक्षक इरपाचे यांनी सांगितली ती घटना

रितीज च्या आरोपावर पोलीस उपनिरीक्षक इरपाचे यांची प्रतिक्रिया

1227

News34 chandrapur

चंद्रपूर – 19 एप्रिलला News34 वर पोलिसाच्या मुलाला पोलिसाने केली अमानुष मारहाण या मथळ्याखाली बातमी प्रकाशित झाली होती. chandrapur police

15 एप्रिलला राधाकृष्ण टॉकीज चौक परिसरात रितीज व त्याच्या 2 मित्रांना रामनगर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक रोशन इरपाचे यांनी विनाकारण मारहाण केली असल्याची लेखी तक्रार रितीज नगराळे ने पोलीस अधीक्षक व दुर्गापूर पोलीस निरीक्षकांना केली आहे, सध्या याबाबत चौकशी सुरू आहे.

सदर प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक रोशन इरपाचे यांची प्रतिक्रिया पुढे आली असून त्यांनी आपली बाजू News34 पुढे मांडली. Ramnagar police chandrapur

15 एप्रिलच्या रात्री काय घडलं?

त्यादिवशी रोशन इरपाचे व पोलीस कर्मचारी पेट्रोलिंग वर होते, काही महिलांनी त्यांना सम्पर्क साधत राधाकृष्ण टॉकीज समोरील रेल्वे रुळावर काही युवक मद्यपान करीत असल्याची माहिती दिली.

विशेष म्हणजे सदर हद्द दुर्गापुर पोलीस ठाण्याची पण रेल्वे रुळाचा भाग हा रामनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असल्याने आम्ही कर्मचारी त्याठिकाणी पोहचलो.

आम्ही त्यांची विचारपूस केली असता त्यामधील रितीज नगराळे यांनी माझे वडील सुद्धा पोलीस असल्याचे सांगितले म्हणून इरपाचे यांनी वडिलांना कॉल करायला सांगितले.

मात्र रितीज यांच्या मोबाईलवर वडिलांचा मोबाईल क्रमांक सेव्ह नव्हता, इरपाचे यांनी रितीज च्या वडिलांना आपला क्रमांक मुलाच्या मोबाईलवर सेव्ह नसल्याचे सांगितले, व रितीज ला सांगा की पुन्हा या ठिकाणी दारू पिण्याचे प्रकार करू नको, वडिलांचा मोबाईल क्रमांक सेव्ह नाही ही बाब वडिलांना का सांगितली याचा रितीज ला राग आला, त्यावेळी रितीज ने माझ्यासोबत धक्काबुक्की केली असा आरोप इरपाचे यांनी रितीज वर लावला.

इरपाचे पुढे म्हणाले की पोलीस हा खाकी वर्दीत असलेला एक सामान्य माणूस आहे, रितीज वर गुन्हा दाखल केला असता तर त्याचं आयुष्य उध्वस्त झालं असत, म्हणून आम्ही कसलाही गुन्हा दाखल न करता तिथून निघून गेलो.

पण दुसऱ्या दिवशी सदर प्रकार घडला.

या सर्व प्रकरणावर चंद्रपूर पोलिसांच्या चौकशी अंती काय निष्पन्न होणार हे समजेलचं.

bottom