चंद्रपूर – कोरोनाच्या महामारीत 2 वर्षे चंद्रपुरातील ऐतिहासिक महाकाली देवीची यात्रेवर बंदी घालण्यात आली होती, कोरोना गेल्यावर वर्ष 2023 ला महाकाली देवीच्या चैत्र नवरात्रीला सुरुवात झाली, यंदा लाखो भाविकांनी महाकाली देवीचे दर्शन घेतले. chandrapur mahakali mandir news
चैत्र पौर्णिमा आधी चंद्रपूर जिल्हा प्रशासनाने सदर यात्रेच्या सुख सुविधेचा आढावा घेतला होता ज्यामध्ये आमदार किशोर जोरगेवार व जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी प्रशासनाला निर्देश दिले मात्र खरी परिस्थिती काही औरच आहे.
सदर यात्रेत दक्षिण भारत व मराठवाडा येथील लाखो भाविक चंद्रपुरात दाखल होतात, महाकाली देवीचे दर्शन घेतल्यावर ते स्वगृही परततात पण चंद्रपूर जिल्हा व मनपा प्रशासनावर नाराज होत.
चंद्रपूर जिल्हा व मनपा प्रशासनाने स्वतः आम्ही या यात्रेसाठी सज्ज आहोत असे जाहीर केले, मात्र चंद्रपुरातील ऐतिहासिक यात्रेत येणाऱ्या भाविकांना यावेळी अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे.
चंद्रपुरात दिवसेंदिवस तापमानात वाढ होत असून भाविकांचे हाल होत आहे, महिलांना शौचालयाची व्यवस्था नाही, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही, अंघोळीसाठी घाणेरडे पाणी अश्या अनेक समस्या यंदा भाविक सोसत आहे.
चंद्रपुरातील जनप्रतिनिधी यांनी सुद्धा यावर्षी याकडे लक्ष दिले नाही विशेष म्हणजे आमदार किशोर जोरगेवार यांनी महाकाली भक्तांसाठी महाकाली महोत्सवाचे आयोजन केले होते, त्यानंतर पालकमंत्री मुनगंटीवार यांनी सुद्धा अयोध्येला जाणाऱ्या सागवान लाकूड साठी कोट्यवधी रुपये खर्च करीत शोभायात्रा काढली, सध्या पालकमंत्री, खासदार व आमदार यांचे बॅनर महाकाली मंदिर परिसरात झळकत आहे. mahakali mandir
चंद्रपुरातील या जनप्रतिनिधी नी सदर यात्रेत फक्त आपली प्रसिद्धी करण्याचे काम केले आहे.
भाविकांना चिखलातून पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी लागत आहे, घाण जागेवर झोपण्यास भाविक हतबल झाले आहे.