क्रिकेटच्या मैदानात यंदा या सट्टेबाजांना चंद्रपूर पोलीस क्लिनबोल्ड करणार काय?

चंद्रपुरात सुरू झाला कोट्यवधी क्रिकेटचा सट्टा

897

News34 chandrapur

चंद्रपूर – IPL T20 क्रिकेट चा महासंग्राम सुरू झाला असून यासाठी चंद्रपुरातील सट्टा प्रेमी तयार झाले आहे.

महिना भर चालणारा हा सण हजारो कोट्यवधी रुपयांची उधळण करणार हे नक्की. Indian premiere league 2023

गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम भागात वर्ष 2021 मध्ये SDPO अमोल ठाकूर यांनी बेधडक कारवाई करीत क्रिकेट वर सट्टा लावणाऱ्या अनेक बुकींना अटक केली होती.

यामध्ये चंद्रपुरातील 30 तर संपूर्ण विदर्भातील एकूण 50 च्या वर बुकींना अटक केली होती, त्यानंतर मात्र तेच बुकीं पुन्हा एक्टिव्ह झाले असून पुन्हा क्रिकेटच्या मैदानात ते कोट्यवधी रुपयांचा सट्टा लावत आहे.

चंद्रपुरात पुन्हा नव्या दमाने जुने क्रिकेट बुकींचे नेटवर्क सक्रिय झाले आहे. Cricket betting

News34 ने याबाबत 31 मार्चला वृत्तही प्रकाशित केले होते, त्या बातमीच्या अनुषंगाने आज क्रिकेट वर सट्टा लावणाऱ्या बुकींचे नाव आम्ही जाहीर करीत आहो.

नीरज, संपत, पारस, अविनाश, महेश, राकेश, पिंटू, राजीक, गुड्डू, अजय, आशिष, अतुल, मिनाज, घरोटे, पिपरिकर, राजा, गावंडे, रॉय, जुगल, येरने, सचिन, खोब्रागडे, इम्रान, कोंडावार, सिराज, दीप व राकेश हे चंद्रपुरातील क्रिकेटच्या मैदानावर बेटिंग करीत आहे.

ह्या सर्व क्रिकेट बुकींचे कनेक्शन सुद्धा अनेक राजकीय नेत्यांशी असल्याची माहिती मिळाली आहे.

गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम भागात पोलीस या क्रिकेट बुकींच्या नेटवर्क ला उध्वस्त करू शकते तर चंद्रपूर पोलीस का नाही?

क्रिकेटच्या सट्ट्या च्या धंद्यात अनेकांची घरे उध्वस्त झाली आहे, अनेक तरुणांनी कर्जाच्या डोंगरामुळे आत्महत्या सुद्धा केली त्यानंतर ही हे नेटवर्क एक्टिव्ह आहे.

कोट्यवधींच्या काळ्याबाजाराबद्दल चंद्रपूर पोलिसांना कल्पना नाही का? Ipl वर सट्टा लावणाऱ्यांवर पोलिसांची कारवाई सुद्धा नाममात्र आहे.

लाखोंचा सेटअप, असंख्य मोबाईल व आपल्या एजंटच्या मोबाईलवर सट्ट्याची एप्लिकेशन, हजारो ID आणि त्यामाध्यमातून दररोज कोट्यवधी रुपयांची उलाढाल.

यंदा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक रवींद्र परदेशी क्रिकेटच्या मैदानात या सट्टेबाजाला क्लिन बोल्ड करणार काय? यावर सध्या प्रश्नचिन्ह उपस्थित आहे.

आज जिल्ह्यात अनेक मोठे गुन्हे उघडकीस आले नाही, SBI बँक दरोडा, शहरातील घरफोड्या व चर्चित दुहेरी हत्याकांडातील आरोपी आजही मोकाट आहे, चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अधिकारी या गुन्ह्यांचा छडा कधी लावणार ही तर येणारी वेळचं सांगेल.

 

bottom