चंद्रपूर जिल्ह्यात अज्ञात वाहनाच्या धडकेत एक दुचाकी स्वार ठार

अपघातात 1 ठार

884

News34 chandrapur

 

कोरपना – अज्ञात वाहनाच्या धडकेत एक दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना बुधवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास कोरपना – आदिलाबाद राष्ट्रीय महामार्ग वरील अकोला जवळील शिव मंदिर समोर घडली. यात दुचाकी स्वार निवृत्ती तुकाराम आत्राम ( २५ ) रा. रायपुर ( परसोडा) याच्या डोक्याला गंभीर इजा पोहचल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.

आत्राम हे रायपुर वरून काही कामानिमित्त कोरपना येथे जात असल्याचे समजते.घटनेची माहिती मिळताच कोरपना पोलिसांनी घटना स्थळी घटनेचा पंचनामा केला. वृत लिहिपावेतो धडक दिलेल्या वाहनाची माहिती मिळू शकली नाही. घटनेचा पुढील ठाणेदार संदीप एकाडे यांच्या मार्गदर्शनाखाली कोरपना पोलीस करीत आहे.

 

bottom