चंद्रपूर जिल्ह्यात अपघात, दोघांचा मृत्यू तर 2 गंभीर जखमी

भीषण अपघात

1451

News34 chandrapur

चंद्रपूर/जिवती – बाप-लेक आपल्या दुचाकीने केकेझरी गावाकडे निघाले मात्र वाटेत मृत्यू त्यांची वाट बघत होता, बाप-लेकाचा अपघात आणि त्या अपघातात दोघांचाही मृत्यू झाला.

सदर घटना चंद्रपूर जिल्ह्यातील जीवती तालुक्यात घडली, सायंकाळच्या सुमारास सचिन राजाराम गायकांबळे व त्यांचा 7 वर्षीय मुलगा अनुष सचिन गायकांबळे, 4 वर्षीय राजेश गायकांबळे व 13 वर्षीय ऋषिकेश गायकांबळे हे दुचाकीने गावाकडे जात होते.

जिवती परमडोली मार्गावर पोहचताच दुचाकी अनियंत्रित झाली आणि सरळ पुलाला धडक दिली, या धडकेत सचिन व अनुष यांचा जागीच मृत्यू झाला तर राजेश व ऋषिकेश हे गंभीर जखमी झाले.
बाप-लेकाच्या मृत्यूमुळे केकेझरी गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

bottom