त्याला पोलीस बनायचं होत, प्रेमभंग झाला आणि घडलं भलतंच

प्रेमभंग झालेल्या युवकाचा प्रताप

1095

News34 chandrapur

यवतमाळ – एका युवकाने शिक्षण पूर्ण करीत मनात पोलीस अधिकारी बनायचं स्वप्न बाळगलं, मात्र त्या कालावधीत एका युवतीसोबत त्याचे प्रेमसंबंध जुळले मात्र प्रेमभंग झाल्यावर त्याने असं काही केलं की त्याला थेट तुरुंगात जावं लागलं.

सोलापूर जिल्ह्यातील तालुका माडा येथील युवक मारोती लुंगशे याला पोलीस अधिकारी व्हायचं होत, त्यासाठी त्याने प्रयत्न सुरू केले होते, मात्र या कालावधीत त्याच एका युवतीवर प्रेम जडलं, मात्र प्रेमात दगा मिळाला.

काही दिवसांनी रेल्वे स्टेशनवर फेरफटका मारत असताना मारोती ला एक मोबाईल सापडला आणि त्यानंतर त्याने महाराष्ट्र पोलीस या वेबसाईटवर जाऊन महिला पोलीस अधिकाऱ्यांचे मोबाईल नंबर प्राप्त करीत त्यांना अश्लील मॅसेज करू लागला.

यवतमाळ जिल्ह्यातील एका महिला पोलीस अधिकाऱ्याला मारोती ने 3 डिसेंम्बर 2022 ला अश्लील मॅसेज केले, याबाबत महिला पोलिसाने वरिष्ठांना सूचित केले, वरिष्ठांनी केलेल्या मार्गदर्शनांनंतर पोलिसात तक्रार दाखल केली.

यवतमाळ शहर पोलिसांच्या डीबी शाखेने याबाबत तपास सुरू केला असता सदर मोबाईल क्रमांक हा सोलापूर येथील असल्याचे समजले, डीबी पथक थेट सोलापूर जिल्ह्यातील लहू या गावी दाखल होताच मारोती ला अटक केली.

शनिवारी मारोती ला न्यायालयापुढे हजर केले असता त्याला 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

bottom