चंद्रपुर जिल्ह्यात पुन्हा भीषण अपघात, कार व बसच्या धडकेत 2 जखमी

चंद्रपूर जिल्ह्यात पुन्हा भीषण अपघात

1543

News34 chandrapur

नागभीड :- ब्रम्हपुरी वरून नागपूर साठी जाणाऱ्या मारुती सुजूकी डिझायर कारने चंद्रपूर वरून ब्रम्हपुरी कडे जाणाऱ्या बस ला भिकेश्वर जवळ समोरासमोर जोरदार धडक दिल्याने दोघे गंभीर जखमी झाले.

आज 24 मे ला सायंकाळी 5 वाजून 30 मिनिटाच्या सुमारास सदर अपघात घडला.

मारुती सुजूकी डिझायर कार नंबर mh49BB0869 ही गिरीश गिडवाणी नागपूर (40)यांची कार असून ते स्वतःच चालवत होते.ते ब्रम्हपुरी वरून नागपूरला भरघाव वेगाने जात असताना वेगावरचा नियंत्रण सुटल्याने चंद्रपूर वरून ब्रम्हपुरी ला जात असलेल्या बस क्रमांक mh 40 N 8949ला जोरदार धडक दिली.

धडक एवढी जबरदस्त होती कार बसला धडकल्याने कार चा चेंदामेंदा झाला. या धडकेत कार मध्ये बसून असलेले कुणाल गंधे नागपूर (30) हा गंभीर जखमी झाला, गिरीश गिडवाणी आणि कुणाल गंधे याला प्राथमिक उपचारासाठी नागभीड येथील सरकारी दवाखान्यात दाखल करून त्यांना पुढील उपचारासाठी नागपूर येथे हलविण्यात आले आहे. पुढील तपास नागभीड पोलीस करत आहेत.

प्रत्यक्षदर्शी नुसार कार चालक हा भरधाव वेगात विरुद्ध दिशेने वाहन चालवीत होता, कार चे नियंत्रण सुटल्याने बस मध्येच थांबवली मात्र कार चालकाने सरळ बस ला धडक दिली त्यामुळे बस व कार चे मोठे नुकसान झाले, सुदैवाने बसमधील प्रवाश्यांना कसलीही दुखापत झाली नाही.

bottom