चंद्रपुरात मनसे विधी विभागाचे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न

मनसेचे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न

512

News34 chandrapur

चंद्रपूर – CSR निधी चा बेकायदेशीर वापर केल्याप्रकरणी मनसे विधी विभागाने यावर आक्षेप घेतला असून 13 मे ला चंद्रपूर वेकोली मुख्यमहाप्रबंधक कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. मात्र ऍड. मंजू लेडांगे यांचं आंदोलन दडपण्याचा प्रयत्न सुरू असल्याची माहिती पुढे आली आहे.

वेकोली ने शहरातील खाजगी चांदा पब्लिक शाळेला 30 संगणक संच व 2 प्रिंटर मशीन CSR निधी मार्फत वाटप केले, मात्र सदर निधी ही गरजवंतांसाठी वापरण्यात येते, याबाबत अनेक नियमसुद्धा बनले आहे. Mns chandrapur

वेकोलीने कोणत्या नियमात खाजगी शाळेला संगणक वाटप केले याबाबत मंजू लेडांगे यांनी वेकोली चे मुख्य महाप्रबंधक संजय वैरागडे यांना जाब विचारला, मात्र यावर त्यांनी आठवडा गेल्यावर सुद्धा उत्तर दिले नसल्याने 13 मे ला लेडांगे यांच्या नेतृत्वात वेकोली कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार असून आंदोलन नंतरही याबाबत समाधानकारक उत्तर मिळाले नाही तर कायदेशीर लढाई सुद्धा लढण्याची तयारी लेडांगे यांनी दर्शवली आहे.

मात्र त्यांचं हे आंदोलन काही वेकोली समर्थक दडपण्याचा प्रयत्न करीत आहे, लेडांगे यांच्या समर्थकांना आंदोलनात न येण्याची तंबी देण्याचे प्रकार सुरू असल्याची माहिती मिळाली आहे.

विशेष म्हणजे सदर आंदोलन दाबण्यासाठी वेकोली प्रशासनाने पोलिसात धाव घेतली, त्यासोबत काही विरोधकांनी सुद्धा मुख्य महाप्रबंधक कार्यालयात ठाण मांडून आंदोलन कसे दाबता येईल याबाबत चर्चा केली अशी माहिती आहे.

पण अश्या विरोधक प्रकाराला न जुमानता 13 मे ला होणारे आंदोलन यशस्वी करून दाखविणार असा विश्वास लेडांगे यांनी व्यक्त केला आहे.

 

bottom