टिव्ही जगतातील प्रसिद्ध अभिनेत्रीचा भीषण अपघातात मृत्यू

सुचंद्रा दासगुप्ता यांचा मृत्यू

1140

News34 chandrapur

कोलकाता – बंगाली मनोरंजन क्षेत्रातील सुप्रसिद्ध अभिनेत्री सुचंद्रा दासगुप्ता यांचा शनिवारी रस्ते अपघातात मृत्यू झाला.

अपघात कसा झाला?

शनिवारी रात्रीच्या सुमारास शूटिंग आटोपून सुचंद्रा घरी जाण्यासाठी निघाली होती, घरी जाण्यासाठी त्यांनी ऐप द्वारे बाईक बुक केली होती, मात्र काही अंतरावर गेल्यावर सायकल चालक रस्त्याच्या मध्ये आला, त्यांनतर दुचाकी चे ब्रेक लागले, मात्र मागून येणाऱ्या वाहनाने बाईक ला धडक दिली, त्या धडकेत सुचंद्रा रस्त्यावर पडल्याने मागून येणाऱ्या ट्रक ने सुचंद्रा ला चिरडून टाकले.

29 वर्षीय सुचंद्रा चा मृत्यू झाल्याची बाब चाहत्यांना कळताच त्यांनी एकच गोंधळ घातला घटनास्थळी वाहतूक खोळंबली होती.

बारा नगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक व्यवस्था सुस्थितीत आणत ट्रक चालकाला अटक केली.

कोण होती सुचंद्रा?

सुचंद्रा बंगाली टीव्ही जगतातील प्रसिद्ध अभिनेत्री होती, त्यांनी अनेक प्रसिद्ध टीव्ही शो मध्ये काम केलं होत, टिव्ही जगतात सुचंद्रा चे नाव मोठं होत, सुचंद्रा च्या अचानक जाण्याने त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून चाहत्यांना सुद्धा मोठा धक्का बसला आहे.

bottom