चंद्रपूर कांग्रेसमध्ये घमासान

वडेट्टीवार गटाला मोठा धक्का

991

News34

चंद्रपूर – नुकत्याच पार पडलेल्या बाजार समिती मध्ये जिल्ह्यात अनेक ठिकाणी कांग्रेसने भाजपसोबत युती करीत चंद्रपूर व राजुरा बाजार समिती काबीज केल्या, कांग्रेसचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे यांच्या नेतृत्वात बाजार समिती निवडणुकीत भाजप सोबत आघाडी करण्यात आली होती. Dismissal from the post of Congress District President

प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी याबाबत दखल घेत प्रकाश देवतळे यांची कांग्रेस ग्रामीण जिल्हाध्यक्ष पदावरून हकालपट्टी केली असल्याचे पत्र काढले.
कांग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी अदानी समूह विरोधात आवाज उचलला मात्र भाजपने हुकूमशाही पद्धतीने राहुल गांधी यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला, त्यानंतर कांग्रेस पक्षाने स्थानिक निवडणुकीत भाजप किंवा त्यांच्यासह सत्तेत असलेल्या पक्षासोबत आघाडी करू नये अन्यथा शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल असे निर्देश कांग्रेस पक्षाच्या वतीने दिले होते. Chandrapur congress
मात्र पक्षादेश झुगारत प्रकाश देवतळे यांनी भाजपसोबत हातमिळवणी करीत आघाडी बनवीत निवडणूका लढल्या, विशेष बाब म्हणजे देवतळे यांनी भाजप सोबत तयार केलेली आघाडी कांग्रेस खासदार बाळू धानोरकर यांच्या विरोधात निवडणुकीत उभी केली होती.
चंद्रपूर बाजार समितीवर कांग्रेस-भाजप आघाडी ने निवडणूक जिंकताच भाजप ग्रामीण जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे व कांग्रेस जिल्हाध्यक्ष देवतळे यांनी विजयी गुलाल उधळीत डान्स केला.
कांग्रेस भाजपच्या अभद्र युतीने जिल्ह्यातील कांग्रेस पक्षाचे प्रामाणिक कार्यकर्ते नाराज झाले होते.
चंद्रपूर जिल्ह्यात झालेल्या बाजार समिती मध्ये राजुरा, वरोरा, चंद्रपूर च्या निवडणूकित कांग्रेस खासदार बाळू धानोरकर यांच्या गटाविरुद्ध माजी पालकमंत्री कांग्रेस आमदार विजय वडेट्टीवार यांच्यात चुरस झाली, एकंदरीत जिल्ह्यातील ही निवडणूक कांग्रेस विरुद्ध कांग्रेस अशी झाली.
ग्रामीण जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे हे आमदार विजय वडेट्टीवार यांचे खंदे समर्थक होते, त्यांच्या हकालपट्टीने वडेट्टीवार यांना मोठा धक्का बसला आहे.
निवडणुकीत खासदार धानोरकर गटाचा पराभव झाल्याने जिल्ह्यात वडेट्टीवार व धानोरकर यांच्यातील अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर आला आहे.
सध्या ग्रामीण कांग्रेस जिल्हाध्यक्ष पदाचा पदभार चंद्रपूर कांग्रेस महानगर जिल्हाध्यक्ष रामू तिवारी यांच्याकडे देण्यात आला आहे.
bottom