शरद पवार यांचा राजीनामा नामंजूर

राष्ट्रवादी कांग्रेसचे अध्यक्ष शरद पवार

789

News34 chandrapur

मुंबई – राष्ट्रवादी कांग्रेसचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांनी अचानक अध्यक्ष पदावरून निवृत्तीचा निर्णय घेतल्याने राष्ट्रवादी कांग्रेस पक्षात एकच खळबळ उडाली होती. Sharad pawar

पवार यांनी आपला निर्णय मागे घ्यावा यासाठी अनेक आमदार व पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिला, मात्र आज राष्ट्रवादी कांग्रेसच्या बैठकीत शरद पवार यांचा राजीनामा नामंजूर करण्यात आला आहे, तसा ठराव सर्वांनी मिळून घेतला असून हा निर्णय शरद पवार यांना कळविण्यात येणार आहे.

पवार हेच राष्ट्रीय अध्यक्षपदी ठेवण्याचा ठराव मंजूर करण्यात आला आहे. समितीची ही शिफारस आता शरद पवार यांना कळवली जाणार आहे. राष्ट्रवादीचे काही नेते शरद पवार यांची भेट घेऊन त्यांना हे ठराव कळवणार आहेत.

या बैठकीला छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल, अजित पवार, सुप्रिया सुळे, जयंत पाटील, एकनाथ खडसे, अनिल देशमुख, पीसी चाको, सुनील तटकरे आणि इतर नेते उपस्थित होते. या बैठकीत इतर कोणताच ठराव मांडला नाही. कोणतीही चर्चा करण्यात आली नाही. पर्यायी अध्यक्ष कोण असावा यावर एका शब्दानेही चर्चा झाली नाही. फक्त चार ओळींचा ठराव मांडून शरद पवार यांच्या अध्यक्षपदावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे.

bottom