संतोष रावत गोळीबार प्रकरणी दोघांना अटक

संतोष रावत गोळीबार प्रकरणात दोघांना अटक

3642

News34 chandrapur

चंद्रपूर – 11 मे ला चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष संतोष रावत यांच्यावर अज्ञातांनी गोळीबार करीत त्यांना जखमी केले होते, या घटनेमुळे जिल्ह्यातील राजकीय क्षेत्रात एकचं खळबळ उडाली होती.

स्थानिक पोलीस प्रशासनाकडे सदर तपास होता मात्र त्यांना काही यश न मिळत असल्याने तपासाची सूत्रे उपविभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नायक यांच्याकडे देण्यात आली.

तपासाची सूत्रे हाती आल्यावर प्रत्येक गोष्टीवर बारकाईने नजर ठेवत नायक यांनी 2 दिवसात आरोपीना अटक केली, गोळीबार प्रकरणात चंद्रपूर शहरातील बाबूपेठ येथे राहणाऱ्या 2 सख्ख्या भावाना पोलिसांनी अटक केली, गोळीबार करण्याचे कारण दोघांनी नोकरीसाठी रावत यांना पैसे दिले होते, मात्र नोकरी मिळाली नसल्याने त्यांनी पैसे परत मागितले होते.

पण रावत हे पैसे परत करीत नसल्याने दोन्ही भावांनी हे पाऊल उचलले असल्याची माहिती मिळाली आहे.

सदर नोकरी कोणत्या विभागातील होती याबाबत अजूनही काही स्पष्ट झाले नाही, मात्र आरोपी काही वेगळीच कहाणी सांगत असल्याची चर्चा सध्या जिल्ह्यात रंगली आहे.

अनेकांनी हा हल्ला राजकीय असल्याचे म्हटले होते, मात्र या प्रकरणात दोघांना अटक झाल्यावर वेगळंच कारण पुढे आले आहे, दोघांकडे बंदूक कुठून आली याचा तपास सध्या सुरू आहे.

विशेष म्हणजे आरोपी हा कांग्रेसच्या एका सेल चा जिल्हाध्यक्ष आहे.

bottom