तो निवांत झोपला होता तितक्यात ट्रक आला आणि…

चंद्रपुरात भीषण अपघात

1667

News34 chandrapur

गोंडपिपरी – चंद्रपूर जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून अपघातांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले असून आजपर्यंत अनेकांचा अपघातात नाहक बळी गेला आहे, सध्या सर्वात जास्त अपघातांचे प्रमाण गोंडपीपरी तालुक्यात झाले आहे.

आष्टि मार्गावर विठ्ठलवाडा बस स्टँडजवळ झालेल्या भीषण अपघातात लगाम बोरी येथील ३५ वर्षीय ट्रक चालक ठार झाल्याची घटना आज बुधवारला रात्रौ 2 वाजताच्या सुमारास घडली आहे.

घटना कशी घडली…

चालकाला झोप लागल्यामुळे गाडी रस्त्याच्या बाजूला उतरली आणि उभ्या असलेल्या एका खाजगी हायवा ट्रकला जाऊन धडकली.चालकाचे डोके गाडीच्या बाहेर निघून असल्यामुळे डोक्याला जबर मार बसला त्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. सदर ट्रक वाहनाचा क्रमांक एम एच ३३ टी १८८२ आहे.

 

आर के ट्रेडर्स ट्रान्सपोर्ट गडचिरोलीच्या मालकीची असलेले ट्रक वाहन गडचीरोली जिल्हातून लाकडे भरून बल्लारपूरकडे येत असताना अचानक ट्रक चालकाला झोप लागल्याने रस्त्यावरील उभ्या वाहनाला ट्रक धडकली या धडकेत चालकाची डोक्यावरील कवटीच उडाली. त्यामुळे ट्रक चालक जागीच ठार झाल्याची घटना विठ्ठलवाडा बसस्थानका समोरील रस्त्यावर घडली आहे.
मृतकाचे नाव अमिद शेख वय ३५ असे असून राजपुर बोरी ता.अहेरी येथील रहिवाशी होता.

घटनेची माहिती गोंडपीपरी पोलीस स्टेशनला कळताच पोलीस कर्मचारी घटनास्थळी हजर झाले.मृतकाचे शव उत्तरणीय तपासणीसाठी गोंडपीपरी येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले असून पुढील तपास गोंडपीपरी पोलिस करीत आहे.

bottom