संतोष रावत गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट, सुत्रधाराला अटक होणार?

मुख्य सुत्रधाराला अटक होणार?

1919

News34 chandrapur

चंद्रपूर – संतोष रावत गोळीबार प्रकरणात पोलिसांना मोठे यश प्राप्त झाले असून या घटनेत वापरण्यात आलेली कार व बंदूक पोलिसांनी जप्त केली आहे.

गोळीबार झाल्यावर घटनेत वापरण्यात आलेल्या कार चा क्रमांक बनावट असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती, मात्र नंबर प्लेट च्या आधारे पोलिसांनी 2 आरोपीना अटक केली.

अटकेतील आरोपी हे कांग्रेस उत्तर भारतीय ग्रामीण संघाचे चंद्रपूर अध्यक्ष राजविर यादव व त्याचा लहान भाऊ अमर यादव यांचा समावेश होता.

त्यांनी घटनेत वापरलेल्या वाहनाचा ओरिजनल क्रमांक MH49U6003 हा आहे, पोलिसांनी जप्त केलेली बंदूक ही देशी बनावटीची आहे.

घटनाक्रम काय?

11 मे ला कांग्रेस नेते व जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष संतोष रावत यांच्यावर गोळीबार करण्यात आला होता, त्या घटनेनंतर जिल्ह्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले होते, माजी पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी प्रशासनाला धारेवर धरत मुख्य आरोपीला अटक करण्याची मागणी केली होती.

गडचांदूर उपविभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नायक यांच्याकडे गोळीबार प्रकरणाचा तपास वर्ग केल्यावर त्यांनी 2 दिवसात 2 आरोपीना अटक केली.

आरोपीचे बयान संशयास्पद

आरोपीना अटक केल्यावर त्यांनी गोळीबार हा पैश्याच्या देवाणघेवाण मधून केला असे सांगितले, काही मुलांना वेकोली मध्ये नोकरी लावून देतो असे म्हणत संतोष रावत यांनी राजविर मार्फत 6 लाख रुपये घेतले होते, नोकरी कुणाला मिळाली नाही, पैसे परत मागितले असता रावत पैसे परत मागितले असता ते उडवाउडवीची उत्तरे देत होते म्हणून त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला.

संतोष रावत काय म्हणाले?

मी आरोपी राजविर यादव ला ओळखत नाही, त्यांनी मला कसलेही पैसे दिले नाही कारण वेकोली सोबत माझा काय संबंध? त्याकरिता पोलीस प्रशासनाने माझी व आरोपीची नार्कोटेस्ट करावी, तसे केल्यास पूर्णसत्य बाहेर येईल व या प्रकरणातील मुख्य सूत्रधार पोलीस प्रशासनाच्या जाळ्यात असेल.

येणाऱ्या काही दिवसात मोठे खुलासे

गोळीबार प्रकरणात पोलिसांना अनेक नवे क्लु मिळाले असून यामध्ये उपराजधानी चे कनेक्शन धागेदोरे सुद्धा आढळून आले आहे, त्यासोबत या गोळीबार प्रकरणात नव्या आरोपींचा समावेश असून त्याला येत्या काही दिवसात अटक होणार अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

bottom