राज्यातील एकमेव कांग्रेस खासदाराच्या अडचणी वाढणार? ED चे पत्र खरे की खोटे?

ईडी ची पीडा

2298

News34 chandrapur

चंद्रपूर – राज्यातील एकमेव कांग्रेस खासदार सुरेश उर्फ बाळू धानोरकर यांच्या अडचणी आता वाढणार आहे, प्रवर्तन निदेशालय म्हणजेच ED ने खासदार धानोरकर यांचे साळे व स्वीय सहायक प्रवीण काकडे यांच्यावर ED ने मनी laundering प्रकरणात चौकशी लावली आहे.

असे पत्र दुपारपासून समाजमाध्यमांवर व्हायरल झाले आहे, मात्र त्यामध्ये किती तथ्य आहे ते आपण जाणून घेऊया.

सदर पत्रात प्रवीण काकडे यांच्यावर PMLA अधिनियम अंतर्गत चौकशी करण्यात येणार असा उल्लेख आहे, मात्र त्यामध्ये एका पोलीस स्टेशनचा उल्लेख करण्यात आलेला आहे, सदर पोलीस स्टेशनमध्ये सम्पर्क केला असता तिथे काकडे यांच्यावर कसलाही गुन्हा दाखल नाही.

 

विशेष बाब म्हणजे सदर पत्रात पोलीस अधीक्षक यांच्या कार्यालयाचा पत्ता सुद्धा चुकीचा आहे, जावक क्रमांक हा 2021 चा आहे.

सहकार्य करावे असे उल्लेख असून त्यापुढे officers of police असे नमूद दिसत आहे, जिल्हा पोलीस अधीक्षकांना आतापर्यंत असे कोणत्याही प्रकारचे पत्र प्राप्त झाले नाही आहे.

याबाबत प्रवीण काकडे यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा मोबाईल स्विच ऑफ मोड मध्ये असल्याने सम्पर्क होऊ शकला नाही.

आजच्या युगात समाज माध्यमांवर असे अनेक खोटे पत्र व्हायरल होतात मात्र त्यामध्ये काही तथ्य नसते, सदर पत्रात कुणी खोडतोड केली असावी असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

हे पत्र खरचं बनावट आहे काय? याबाबत येत्या 2 दिवसात सत्य आम्ही प्रसारित करू..

 

bottom