चंद्रपुरातील oyo मध्ये कोण मिळालं?

पोलिसांची कारवाई

52563

News34 chandrapur

चंद्रपूर – oyo हॉटेलच्या नावाखाली हळूहळू अश्लीलतेचा बाजार सुरू झाला आहे, शहरात अनेक ठिकाणी oyo हॉटेल्स सुरू झाले आहे, ओयो मधील रूम्स ह्या तासानुसार भाड्याने मिळतात, मात्र यामध्ये जाणारे आजकालची युवापिढी.

Oyo हॉटेल्स ची बुकिंग ऑनलाइन व ऑफलाईन द्वारे केल्या जाते, आधार कार्ड दाखवा आणि प्रवेश घ्या अशी नियमावली oyo हॉटेल्सची आहे, मात्र त्या रूम मध्ये काय चालत यावर न बोललेलं बरं.

चंद्रपुरात अल्पवयीन मुला-मुलींना oyo हॉटेलमध्ये प्रवेश दिला जात असल्याची माहिती रामनगर पोलिसांना मिळाली होती, माहितीच्या आधारे चंद्रपूर अष्टभुजा बायपास मार्गावर असलेल्या ओयो हॉटेलमध्ये पोलिसांनी झाडाझडती घेतली असता तिथे 2 मूल आढळले.

पोलिसांनी दोघांना चौकशीसाठी पोलीस ठाण्यात आणले, दोघे प्रियकर व प्रेयसी असल्याचे चौकशीअंती निदर्शनास आले, दोघेही अल्पवयीन नसल्याचे स्पष्ट झाले, सोबत दोघांच्या पालकांना ठाण्यात बोलावणे करीत त्यांचे बयान नोंदवीत दोघांची समजूत काढत सोडण्यात आले.

विशेष बाब म्हणजे अनेक oyo चालक नागरी वस्ती किंवा बाहेर ठिकाणी हॉटेल थाटतात, मुले-मुली सदर हॉटेलमध्ये गेल्यावर त्याठिकाणी काय चालतं, हे अनेकांना चुकून कळलेले आहे.

पोलिसांसोबत पालकांनी सुद्धा आता या बाबीवर लक्ष ठेवत आपले पाल्य काय करतात यावर लक्ष ठेवणे गरजेचे आहे, अन्यथा मोठी घटना घडली तर त्यासाठी अनेकजण जबाबदार राहणार.

bottom