चंद्रपूर शहरात महिलेची हत्या

चंद्रपुरात हत्या

1829

News34 chandrapur

चंद्रपूर – जिल्ह्यात सतत गुन्हेगारीचा आलेख वाढत असून 16 मे ला शहरातील चोर खिडकी परिसरात एका महिलेची हत्या झाल्याची घटना उघडकीस आली आहे.

चोरखिडकी निवासी 65 वर्षीय शर्मिला सकदेव या महिलेच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार करीत हत्या करण्यात आली.

मृतक महिलेच्या पतीचा महिन्याभरापूर्वी मृत्यू झाला असल्याची माहिती मिळाली आहे.

याबाबत माहिती मिळताच तात्काळ रामनगर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास करीत आहे.

bottom