चंद्रपूर जिल्हा महिला कांग्रेसच्या शिलेदारांची कार्यकारणी जाहीर

कार्यकारणी जाहीर

788

News34 chandrapur

चंद्रपूर – अखिल भारतीय महिला काँग्रेस च्या अध्यक्ष नेत्ता डीसुजा यांच्या मार्गदर्शनात, महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस च्या अध्यक्ष संध्या सव्वालाखे यांनी चंद्रपूर जिल्हा महिला काँग्रेस च्या विस्तारित कार्यकारणी ला मान्यता दिली आहे. Mahila congress

या कार्यकारणीत एकूण १५५ सदस्य असून ५ विधानसभा समनव्यक, १४ तालुका अध्यक्ष, १६ शहर अध्यक्ष, १८ उपाध्यक्ष, ३७ जिल्हा महासचिव, ६४ जिल्हासचिव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अशी माहिती महिला काँग्रेस च्या जिल्हाध्यक्ष नम्रता आचार्य-ठेमस्कर यांनी दिली आहे.

या मध्ये चंद्रपूर विधानसभा समन्वयक पदी सुनीता धोटे, बल्लारपूर विधानसभा समन्वयक पदी सुरेखा शेंडे, राजुरा समन्वयक पदी मेघा नलगे, वरोरा विधानसभा समन्वयक पदी चित्रा अहिरकर यांची तर चिमूर विधानसभा समन्वयक पदी नितु गुरपुडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

चंद्रपूर तालुका अध्यक्षपदी शितल कातकर, बल्लारपूर अफसाना सय्यद, मूल रुपाली संतोषवार, राजुरा निर्मला कुळमेथे, गोंडपीपरी सोनू दिवसे, कोरपना आशा खासरे, जिवती नंदा मुसणे, वरोरा यशोदा खामनकर, भद्रावती वर्षा ठाकरे, सावली उषा भोयर, सिंदेवाही सीमा सहारे, ब्रह्मपुरी मंगला लोनबले, चिमूर वनिता मगरे, नागभीड प्रणया गड्डमवार यांची तालुका अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

तर शहरध्यक्ष  म्हणून बल्लारपूर मेघा भाले,मूल नलिनी आडपवार, राजुरा संध्या चांदेकर, गोंडपीपरी सपना साखलवार, कोरपना मनीषा लोडे, जिवती सुनीता वेट्टी, गडचांदूर माधुरी पिंपळकर, वरोरा दीपाली माटे, भद्रावती सरिता सूर, चिमूर गीतांजली थुटे, नागभीड सुनीता डोईजड, नेरी सारिका पंधरे, ब्रह्मपुरी योगिता आमले, सिंदेवाही प्रीती सागरे, सावली भारती चौधरी, घुगूस संगीता बोबडे यांची शहर अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर जिल्हा सोशल मीडिया समन्वयक पदी श्रुती कांबळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे प्रदेशाध्यक्ष संध्या सव्वालाखे आणि जिल्हाध्यक्ष नम्रता आचार्य ठेमस्कर यांनी अभिनंदन केले आहे व पुढील कार्या साठी शुभेच्छा दिल्या आहे.

bottom