बल्लारशाह रेल्वे जंक्शनवर प्रवाश्यांचा धिंगाणा

सुपरफास्ट रेल्वेच्या ac मध्ये आला बिघाड

8218

News34 chandrapur

चंद्रपूर :-   महाराष्ट्रातील बल्लारशाह रेल्वे स्थानकावर, जयपूर-चेन्नई सुपर फास्ट ट्रेनच्या 12968 बी-5 बोगीचा एसी बिघाड झाल्याने प्रवाशांनी गोंधळ घातला, प्रवाशांनी सांगितले की, जयपूरहून ट्रेन सुटल्यापासून बी-5 बोगीचा एसी बंद आहे, प्रवाशांनी अनेकदा तक्रारी केल्या.
याबाबत अनेकवेळा रेल्वे कर्मचाऱ्यांकडे तक्रार केली, ज्या स्थानकांवर ट्रेन थांबली तेथे याबाबत तक्रारी केल्या, मात्र प्रत्येक वेळी रेल्वेने पुढील स्थानकावर एसी दुरुस्त करण्याचे आश्वासन दिल्याने प्रवाशांनी आपला निम्मा प्रवास गर्मीच्या भीषण तडाख्यात केला. Indian railway
रेल्वेच्या बाजूनेही कोणतीच कारवाई झाली नाही, त्यामुळे प्रवाशांचा संयम सुटला आणि एसी दुरुस्त करण्याची मागणी करत बल्लारशाह रेल्वे स्थानकावर गदारोळ झाला,
15 मे सायंकाळी 17.45 ला सदर ट्रेन बल्लारपूर रेल्वे जंक्शन वर थांबली असता प्रवाश्यानी खाली उतरत एकच गोंधळ घातला. mgr chennai central to jaipur train 12968

तीनदा ट्रेन ची साखळी खेचली

ट्रेन फिरू लागताच प्रवाशांनी तब्बल तीन वेळा ट्रेन ची साखळी खेचून सुमारे दीड तास रेल्वे स्थानकावर थांबवली, दरम्यान, आरपीएफ, जीआरपी आणि स्थानिक पोलीस आणि रेल्वे प्रशासन प्रवाशांना समजावण्याचा आटोकाट प्रयत्न करत होते, मात्र प्रवाशी समजण्याच्या मनस्थिती मध्ये नव्हते.  एसी सुरू होईपर्यंत ट्रेन पुढे जाणार नाही अशी भूमिका प्रवाश्यानी घेतल्यावर रेल्वे प्रशासनाची चांगलीच दमछाक झाली.

तापमानवाढीचा प्रवाश्यांना फटका

 एकीकडे कडाक्याच्या उन्हामुळे बोगीचा एसी बिघाड झाल्याने प्रवाशांची अवस्था बिकट झाली असताना एसी बोगीतील प्रवासीही कागद, उशीच्या साह्याने हवा उडवून दिलासा देण्याचा प्रयत्न करत होते. The ac of the railway coach was switched off

स्टेशन मास्तर यांनी प्रवाश्यांना दिले लेखी आश्वासन

 बल्लारशाह स्थानकात एसी दुरुस्त करण्यासाठी  इलेक्ट्रीशियन नाही, तरीही प्राथमिक तपासणी केली असता एसी सुरळीत होऊ शकला नाही, सुमारे दीड तासाच्या गदारोळानंतर बल्लारशाह स्थानकाचे स्टेशन मास्तर आर.के.  टी. नंदनवार यांनी प्रवाशांना लेखी पत्र दिले की पुढील वारंगल स्थानकावर एसी दुरुस्त करण्यात येईल, त्यानंतर प्रवाशांनी होकार दिला आणि ट्रेन पुढे निघाली, एकीकडे आपण बुलेट ट्रेनबद्दल बोलत आहोत, अनेक शहरांमधून वंदे भारत ट्रेन सुरू झाली. मात्र सुपर फास्ट गाड्यांमध्ये अशा घटना रेल्वे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर अनेक प्रश्न उपस्थित करत आहेत.
bottom