संतोष रावत गोळीबार प्रकरणातील आरोपी राजबिर यादव वर कांग्रेसची कारवाई

पक्षातून हकालपट्टी

1969

News34 chandrapur

चंद्रपूर – कांग्रेस नेते व चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष संतोष रावत यांच्यावर गोळीबार करणाऱ्या कांग्रेस उत्तर भारतीय सेलचे ग्रामीण अध्यक्ष राजबिर यादव यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्याचे पत्र प्रदेश कांग्रेस कमिटीने जारी केले आहे.

11 मे ला मूल येथे संतोष रावत यांच्यावर अज्ञातांनी गोळीबार केला होता, सदर घटनेनंतर जिल्ह्यातील राजकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली होती.

पोलिसांनी तपासाला गती देत गोळीबार प्रकरणात कांग्रेस उत्तर भारतीय ग्रामीण सेल चा अध्यक्ष राजबिर यादव ला अटक केली, अटक केल्यानंतर पक्षाने त्याची हकालपट्टी केली नव्हती, आज 26 मे ला कांग्रेस पक्षाचे प्रदेश महासचिव उत्तर भारतीय सेल चे महाराष्ट्र अध्यक्ष उमाकांत अग्निहोत्री यांनी राजबिर यादव यांची पक्षातून हकालपट्टी केली असल्याचे पत्र जारी केले.

bottom