चंद्रपूर जिल्ह्यात शेतकऱ्याला मारहाण, धानोरकरांवर आरोप

आम्हाला न्याय द्या

1580

News34 chandrapur

 

चंद्रपूर : वर्षानुवर्षांपासून कसत असलेल्या शेतात जाण्यासाठी असलेला वहिवाटीचा रस्त्यावर अतिक्रमण करून शेजारच्या शेतकऱ्यांने रस्ता बंद केला. त्यामुळे शेती कसायची कशी असा प्रश्न पीडित शेतकऱ्यांने उपस्थित केला आहे. दरम्यान, तलाठी, तहसील कार्यालयात याबाबत तक्रारी केल्या आहेत. मात्र, न्याय मिळत नसल्याने न्यायाची अपेक्षा करायची कुणाकडून असा प्रश्नही पीडित शेतकरी शांताराम पांडूरंग बोनगीरवार यांनी चंद्रपूर श्रमिक पत्रकार भवनात आयोजित पत्रकार परिषदेत केला आहे. Press conference

 

गोंडपिपरी तालुक्यातील धामनगाव येथे शांताराम बोनगीरवार यांची शेती आहे. बोनगीरवार यांच्या शेतीलगत सुधाकर धानोरकर यांची शेती आहे. परंतु, दोन्ही शेताच्यामध्ये नाला असून, नाल्याच्या एका बाजूने शेतात जाण्यासाठी वर्षानुवर्षांपासून वहिवाटीचा रस्ता आहे. या रस्त्याने बोनगीरवार हे शेतात जात असत. मात्र, धानोरकर यांनी यांनी रस्त्यावर अतिक्रमण करून हा रस्ता बंद केला आहे. Encroachment

 

या रस्त्याने जाण्यासाठी धानोरकर प्रतिबंध करीत आहे. मात्र, हा एकमेव रस्ता शेतात जाण्यासाठी आहे. त्यामुळे शेतात जायचे कसे असा प्रश्न शांताराम बोनगीरवार यांनी उपस्थित केला आहे. यापूर्वी धानोरकर यांनी या रस्त्यावरून मारहाण केली. मारहाणीत हातही फ्रॅक्चर झाला होता. मात्र,याची तक्रारही गोंडपिपरी पोलीस ठाण्यात करण्यात आली होती. परंतु, पोलीस धानोरकर यांची पाठराखण करीत असल्याचा आरोप बोनगीरवार यांनी केला आहे.

bottom