पदाला न्याय द्या, खासदार धानोरकर यांच्या नव्या काँग्रेस अध्यक्षांना शुभेच्छा

रामू तिवारी यांना शुभेच्छा

765

News34 chandrapur

 

चंद्रपूर : देशात काँग्रेस पक्ष वाढविण्यासाठी तसेच हुकूमशाही मोदी सरकार विरोधात देशात काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी हजारो किलोमीटर पायदळ फिरत भारत जोडोचा नारा दिला. मात्र, चंद्रपूर बाजार समिती निवडणुकीत काँग्रेस अध्यक्ष प्रकाश देवतळे यांनी भाजपसोबत हातमिळवणी करून भाजप अध्यक्ष देवराव भोंगळे यांच्यासोबत डान्स केला होता. त्यामुळे जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांचे मनोबल खालावले. त्यामुळे महाराष्ट्र काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी आज पत्रक काढून काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे यांची पदावरून हकालपट्टी केली. Chandrapur congress news

त्यांचा पदभार शहर काँग्रेस अध्यक्ष रामू तिवारी यांच्याकडे सोपविण्यात आला. पक्ष विचारधारेप्रमाणे काम करून पदाला न्याय देणार असल्याचे प्रतिपादन चंद्रपूर जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटी चे प्रभारी जिल्हाध्यक्ष रामू तिवारी यांनी केले. Congress party

चंद्रपूर येथील जनसंपर्क कार्यालय येथे खासदार बाळू धानोरकर यांनी रामू तिवारी यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांना शुभेच्छा दिल्या.

यावेळी माजी नगरसेवक प्रसन्न शिरवार, साबीर सिद्दीकी, संजय गंपावार, कुणाल चहारे, काशिफ अली, रमीझ शेख, राजीव खजांची यांची उपस्थिती होती.

bottom