राष्ट्रीय ओबीसी आयोग अध्यक्ष हंसराज अहिर यांची माणुसकी

चंद्रपुरात हंसराज अहिर यांच्या माणुसकीची चर्चा

892

News34 chandrapur

चंद्रपूर – राजकीय क्षेत्रात सक्रिय असताना नेत्यांना सामाजिक कर्तव्याची जाणं असतेचं, याचं जिवंत उदाहरण आज अनेक नागरिकांना समोर बघायला मिळालं.

2 मे सकाळचे 8 वाजून 45 मिनिटे झाले होते, चंद्रपूर-बल्लारपूर मार्गावरील सिद्धार्थ नगर चौकासमोर एक अपघात झाला, सदर अपघातामध्ये 2 नागरिक गंभीर जखमी झाले. Humanity

दोघे जखमी नागरिक रस्त्यावर पडून होते, कुणीही त्यांना उचलण्याची हिंमत केली नाही, तितक्यात राष्ट्रीय ओबीसी आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर ताफ्यासह निघाले होते. Road accident

त्यांना 2 युवक रक्तबंबाळ अवस्थेत दिसले असता त्यांनी तात्काळ आपला ताफा थांबवित जखमींना उचलत तात्काळ शासकीय रुग्णालयात पोहचविले. Chandrapur news

त्या जखमी सोबत अहिर यांनी आपल्या कार्यकर्त्यांना पाठविले व शासकीय रुग्णालयातील डॉक्टर जीवने यांच्याशी चर्चा करीत जखमी युवकावर उपचार करण्याचे निर्देश दिले.

सतत राजकीय व सध्या ओबीसी आयोगाच्या कामात व्यस्त असणारे हंसराज अहिर हे अपघातग्रस्त रुग्णांसाठी धावले ही त्यांच्यात असलेल्या माणुसकीची एक प्रचितीचं म्हणावी लागेल.

 

bottom