शिवसेनेतर्फे आरोग्य शिबिराचे आयोजन

आरोग्य शिबिराचे आयोजन

149

News34 chandrapur   गुरू गुरनुले

मुल – छत्रपति शिवाजी महाराज तथा हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला मालार्पण व वंदन करुन शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब बाळासाहेब ठाकरे व युवासेनाप्रमुख आदित्यसाहेब उद्धवसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार,शिवसेना जिल्हासंपर्कप्रमुख चंद्रपूर प्रशांतदादा कदम साहेब यांच्या सूचनेनुसार, शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप भाऊ गिर्हे यांच्या मार्गदर्शनात शिवसेना तालुका प्रमुख प्रशांत गट्टूवार यांचे नेतृत्वात शिवसेना जिल्हा चंद्रपूर तालुका मूल व लोककल्याण आरोग्य केंद्र मुंबई ठाणे यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित भव्य नेत्र तपासणी शिबीर व आरोग्य तपासनी ला शुरुवात झाली,शिबीर पहिला दिवस हनुमान मंदिर चांदापुर येथे घेण्यात आले. शेकडो च्या संखेने या शिबिराचा लाभ स्थानिक रहिवासी यानी घेतला.

शिवसेना तालुका प्रमुख प्रशांत गट्टूवार यांचे हस्ते फित कापुन उद्घाटन करण्यात आले, तसेच जेष्ठ व माझी शिव सेना तालुका प्रमुख सुनील भाऊ काळे यांचे हस्ते पूजन करून आरोग्य शिबीर कार्यक्रम ला सुरु करण्यात आले.

शिबीर रविभाऊ शेरकी तालुका संघटक यांचे प्रमुख नेतृत्वात घेण्यात आले, यावेळी शिवसेना शहर प्रमुख मनोज मोहुर्ले,महिला आघाड़ी तालुका प्रमुख रजनी ताई झाड़े प्रामुख्यानी उपस्थित होते,सोबत शिवसेना माजी उपतालुका प्रमुख शंकर पाटेवार,विभाग प्रमुख संदीप गिरड़कर, व समस्त पदाधिकारी, शिवसैनिक, युवासैनिक, महिला संघटिका व समस्त गावकरी उपस्थित होते.

bottom