तुमच्या नावावर किती सिमकार्ड आहे? या सोप्या पद्धतीने जाणून घ्या

जाणून घ्या सोपी पद्धत

1606

News34 chandrapur

चंद्रपूर/tech update – नव्या मोबाईल कंपन्यांच्या विविध ऑफर च्या आमिषाला बळी पडत अनेक नागरिक आपले मोबाईल क्रमांक बदलवित असतात, त्यामुळे त्यांच्या नावावर अनेक मोबाईल क्रमांक नोंदणीकृत होत असतात, आपल्या नावावर किती सिम कार्ड नोंदणीकृत आहे हे कसे ओळखायचे हा मोठा प्रश्न आपल्यासमोर उदभवतो.

मात्र यावर भारत सरकारने तोडगा काढला असून आपल्या नावे किती सिम कार्ड नोंदणीकृत आहे हे एका पोर्टल च्या माध्यमातून कळण सोपं झालं आहे.

यासाठी भारत सरकारने एक पोर्टल सुरू केले आहे, आपल्या फोनवर एकापेक्षा जास्त सिम कार्ड नोंदणीकृत असल्यास ते बंद कसे करावे याबाबत पोर्टल वर विस्तृत माहिती मिळते.

काय आहे ती प्रक्रिया?

 

  1. सुरुवातीला ब्राउझर वर https://tafcop.dgtelecom.gov.in ही लिंक उघडा. या वेब पोर्टलच्या माध्यमातून तुम्हाला त्या व्यक्तीच्या नावावर किती सिमकार्ड आहेत याची माहिती मिळू शकते. जर तुमच्या ओळखपत्राच्या आधारे कोणीतरी बनावट सिम कार्ड वापरत असेल तर ते नंबर किंवा पोर्टल ब्लॉक करू शकतात.मात्र एका ओळखपत्राच्या आधारे, तुम्ही जास्तीत जास्त 9 सिम कार्ड वापरू शकता.
  2. या विभागाच्या या पोर्टलवर आल्यावार यामध्ये तुम्हाला तुमचा सध्याचा मोबाईल नंबर टाकावा लागेल. त्यानंतर रिक्वेस्ट OTP बटणावर क्लिक करा.
  3. यानंतर चालू मोबाइल नंबर टाकल्यानंतर तुम्हाला तुमच्या मोबाइलवर एक OTP येईल, त्यानंतर तुम्हाला तो ओटीपी बॉक्समध्ये टाकावा लागेल आणि व्हॅलिडेट बटणावर क्लिक करावे लागेल. मोबाईल आणि OTP अद्याप नसल्यास OTP पुन्हा पाठवा लिंकवर क्लिक करा.
  4. आता व्हॅलिडेट वर क्लिक केल्यानंतर, तुम्हाला तुमच्या आयडी प्रूफ आणि मोबाईल नंबरची यादी दिसेल जी सक्रिय आहेत. तुम्ही वापरत असलेल्या क्रमांकाव्यतिरिक्त, तुम्ही वापरत नसलेले किंवा तुमचे नसलेले नंबर तुम्हाला दिसल्यास, तुम्ही सिम कार्ड बंद करू शकता.

सिमकार्ड बंद करण्यासाठी काय करावे?

  1. तुम्हाला जर सिमकार्ड बंद करायचे असेल तर बॉक्समध्ये तुमचे नाव टाका, त्यानंतर खाली रिपोर्ट या बटणावर क्लिक करा.
  2. रिपोर्ट ऑप्शनवर क्लिक केल्यावर तुम्हाला एक संदर्भ क्रमांक दिसेल. त्यामुळे कुठेतरी संदर्भ क्रमांक लिहून ठेवा किंवा मोबाईलमध्ये सेव्ह करा किंवा फोटो काढा.
  3. काही दिवसांनंतर, तुम्ही केलेल्या अहवालाचे तपशील पाहण्यासाठी, पोर्टल किंवा वेब पोर्टलवर लॉगिन करा. म्हणजे स्टेप्स 1प्रमाणे. मग तुम्हाला तुमचा अहवाल, तुम्हाला तुमचा रिपोर्ट ट्रॅक करण्यासाठी तुमचा Ticket ID Ref No. वरती असलेल्या बॉक्समध्ये टाका.
  4. नंतर तुमच्यासमोर तुमच्या रिपोर्टचा स्टेटस उघडेल. तर अशाप्रकारे न वापरलेले सिमकार्ड, तुम्ही न घेतलेले  सिमकार्ड या पोर्टलच्या माध्यमातून बंद करु शकता. तुम्हाला तुमच्या नावावर किती सिम कार्ड चालू आहे हे सुद्धा कळू शकते.
bottom