संतोष रावत गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट

संतोष रावत गोळीबार प्रकरण

2296

News34 chandrapur

चंद्रपूर – जिल्ह्यातील मूल शहरात गुरुवार 11 मे ला रात्री 9 वाजून 20 मिनिटांनी cdcc बँकेच्या समोर बँकेचे अध्यक्ष संतोष रावत यांच्यावर अज्ञातांनी गोळीबार केल्याची थरारक घटना घडली होती, गोळीबार केल्यावर हल्लेखोरांनी वाहनातून पळ काढला, या हल्ल्यात रावत सुदैवाने बचावले होते, मात्र गोळी त्यांच्या हाताला स्पर्श करून गेली. Chandrapur police

आता संतोष रावत गोळीबार प्रकरण चांगलेच तापले असून पोलीस प्रशासनाला यामध्ये सध्यातरी यश मिळाले नाही आहे. पोलीस प्रशासनाने हल्लेखोरांना अटक करण्यासाठी तब्बल 15 पथके तयार केली आहे.
माजी पालकमंत्री विजय वडेट्टीवार व ठाकरे गटाचे रवींद्र शिंदे यांनी या प्रकरणाचा तपास IPS अधिकाऱ्याला द्यावा अशी मागणी केली होती.

चंद्रपूर जिल्हा पोलीस अधीक्षक परदेशी यांनी रावत गोळीबार प्रकरणाच्या तपासाची जबाबदारी उपविभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नायक यांच्याकडे दिली आहे.
नायक हे सध्या गडचांदूर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून कर्तव्य बजावत आहे.

कोण आहे सुशीलकुमार नायक?

नायक यांनी याआधी गडचांदूर विभागातून उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून काम बघितले होते, चंद्रपूर जिल्ह्यातील प्रत्येक घडामोडी वर त्यांची बारीक नजर असते, पोलीस प्रशासनातील अनेक मोठ्या गुन्ह्याचा तपासात त्यांनी महत्वाची भूमिका बजावली आहे.
पोलीस विभागात त्यांचा दांडगा अनुभव बघता रावत गोळीबार प्रकरणात त्यांना लवकर यश मिळेल व या गुंतागुंतीच्या गोळीबार प्रकरण कसे घडले याचा उलगडा झाल्याशिवाय राहणार नाही.

कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून सुशीलकुमार नायक यांची चंद्रपूर जिल्ह्यात ओळख आहे, जिल्ह्यातील विविध गुन्ह्यांचा तपास त्यांनी संयमाने हाताळत यश मिळविले आहे.

संतोष रावत गोळीबार प्रकरणात आरोपी कुठेही लपून बसले असेल तर ते काही दिवसात पोलिसांच्या जाळ्यात नक्कीच असणार.

bottom