चंद्रपुरात युवासेनेच्या शाखेचा अनावरण सोहळा

युवासेनेची शाखा गठीत

428

News34 chandrapur

चंद्रपूर – युवासेना प्रमुख आदित्यसाहेब ठाकरे यांना प्रेरित होऊन असंख्य युवासैनिक यांचा पक्षप्रवेश आणि नवीन युवासेना शाखा उद्घघाटन समारंभ कार्यक्रम शिवसेनेचे चंद्रपूर जिल्हाचे लाडके जिल्हाप्रमुख संदीपभाऊ गिऱ्हे यांच्या मार्गदर्शनात व चंद्रपूर जिल्हाचे युवासेनेचे जिल्हाप्रमुख विक्रांतभाऊ सहारे यांच्या नेतृत्वात महाकाली कॉलरी येथे युवासेनेचे शाखा गठीत करण्यात आली असून यावेळी शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख शालिक फाले ( गुरुजी ) व युवासेनेचे जिल्हाप्रमुख विक्रांतभाऊ सहारे यांच्या हस्ते फिता कापून नवीन शाखा उघडण्यात आली. Yuva sena

युवासेना जिल्हाप्रमुख विक्रांत सहारे यांच्या नेतृत्वात जिल्ह्यात युवासेनेची बांधणी जोरात सुरू असून आजपर्यंत जिल्ह्यातील हजारो कार्यकर्ते युवासेनेत प्रवेश घेत आहे.

यावेळी युवासेनेचे उपजिल्हा अधिकारी रिझवान पठाण , शहर प्रमुख शहाबाज शेख ,उपशहर प्रमुख संघदीप रामटेके , उपशहर प्रमुख नरेश वासनिक , उपशहर प्रमुख सार्थक शिर्के , शाखा प्रमुख करणं वर्मा , उपशाखा प्रमुख अंकित वर्मा , शाखा सचिव रोहन वर्मा ,जुनेद खान व आदी युवासैनिक व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

bottom