12 वीच्या निकालात मुलींनी मारली बाजी

एका क्लिकवर निकाल

1831

News34 chandrapur

चंद्रपूर – महाराष्ट्र राज्य बोर्डाच्या वर्ग 12 वी चा निकाल आज 25 मे ला ऑनलाइन पध्दतीने जाहीर करण्यात आला, यंदा मुलींनी निकालात आघाडी घेतली असून यंदा 93.73 टक्के तर मुलांच्या निकालाची टक्केवारी 89.14 इतकी आहे.

राज्यात 12 विचा निकाल 91.25 टक्के लागला असून दुपारी 2 वाजता निकाल ऑनलाइन जाहीर करण्यात येणार आहे. Mahahsc results 2023

विज्ञान शाखेचा निकाल 96.09 टक्के, वाणिज्य शाखा – 90.42 टक्के, कला शाखा – 84.05 टक्के तर व्यावसायिक अभ्यासक्रमाचा निकाल – 89.25 टक्के लागला.

राज्यातील विभागनिहाय निकाल पुढीलप्रमाणे आहे..

कोकण – 96.01

मुंबई – 88.13

पुणे – 93.34

नाशिक – 91.66

लातूर – 90.37

कोल्हापुर – 93.28

अमरावती – 92.75

नागपूर – 90.35

औरंगाबाद – 91.85

कसा व कुठे बघायचा निकाल?

Maharesult.nic.in

hsc.maharesult.org.in

hscresult.mkcl.org

असा करा मोबाईल द्वारे sms

SMS द्वारे निकाल मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांना मेसेज बॉक्समध्ये जावून आपला सीट नंबर टाकून 57766 या क्रमांकावर सेंड करावा लागणार आहे. यानंतर त्याच मोबाईल नंबरवर तुम्हाला तुमचा निकाल पाहता येईल.

संकेतस्थळ ओपन केल्यावर त्यामध्ये तुमचा सीट नंबर आणि जन्म तारीख टाकून तुम्ही तुमचा निकाल पाहू शकता. यानंतर त्या PDF ची प्रिंटआऊट काढून घ्या.

bottom