महाराष्ट्र दिनानिमित्त आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते तहसील कार्यालय येथे ध्वजारोहण

217

News34 chandrapur

चंद्रपूर – 1 मे महाराष्ट्र दिनानिमित्त चंद्रपूर येथील तहसील कार्यालय येथे सकाळी 7 वाजता आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी प्रभारी तहसिलदार जितेंद्र गादेवार, नायब तहसीलदार राजू धांडे, दिलीप गोडसेलवार आदींची प्रमुख उपस्थिती होती. Labour Day

आज 1 मे रोजी राज्यभरात महाराष्ट्र दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. चंद्रपूर येथील तहसील कार्यालयातही महाराष्ट्र दिनानिमीत्त ध्वजारोहण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सकाळी 7 वाजता आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते येथील ध्वजारोहन करण्यात आले. ध्वजारोहन होताच उपस्थितांनी तिरंग्याला सलामी देत राष्ट्रगीत गायले.
महाराष्ट्राचा ऐतिहासिक, सांस्कृतिक, सामाजिक वारसा फार मोठा आहे. May day

देशाच्या प्रत्येक उपक्रमात महाराष्ट्राने हिरीरीन सहभाग घेतला आहे. प्राचीन संस्कृतीचा वारसा सांभाळतानाच देशाच्या विकासातही महाराष्टाने योगदान दिले आहे. महाराष्ट्राचा धार्मिक आणि सामाजिक सुधारणांचा इतिहास प्रेरणादायी असल्याचे यावेळी जोरगेवार म्हणाले. या ध्वजारोहण कार्यक्रमला तहसील कार्यालयातील शासकीय, निमशासकीय कर्मचा-यांची मोठ्या यंख्येने उपस्थिती होती.

bottom