सामाजिक कार्यकर्त्यांची हत्या, राष्ट्रवादी कांग्रेसच्या आमदारावर हत्येचा कट रचल्याचा आरोप

सामाजिक कार्यकर्त्यांची हत्या

516

News34 chandrapur

Pune crime – 12 मे ला भरदिवसा सामाजिक कार्यकर्ते किशोर आवारे यांच्या 4 जणांनी गोळ्या झाडल्या त्यांनतर कोयत्याने वार करीत त्यांना गंभीर जखमी केले होते मात्र उपचारादरम्यान आवारे यांचा मृत्यू झाला, आवारे यांच्या हत्याप्रकरणात मृतकाच्या आईने थेट मावळ मधील राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाचे आमदार सुनील शेळके यांच्यावर आरोप करीत त्यांना दोषी ठरविले आहे.

किशोर आवारे यांच्यावर हल्ला कुणी व का केला याबाबत पोलीस तपास करीत आहे, मात्र मृतकाच्या आईने थेट आमदारावर आरोप केल्याने या प्रकरणाला वेगळे वळण प्राप्त झाले असून पोलीस सध्या cdr ची तपासणी करीत आहे.

आरोपीनी आवारे यांच्यावर हल्ला केल्यावर तिथून काही नागरिकांच्या दुचाकी घेऊन पळ काढला, याबाबत दुचाकी चोरीची फिर्याद सुद्धा नोंदविण्यात आली आहे.

हत्येचा कट मावळमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील शेळकेंनी रचल्याचा आरोप आवारे यांच्या आईने केला आहे. एफआयआरमध्ये आमदार सुनील शेळके, त्यांचे भाऊ सुधाकर शेळके, संदीप गराडे, श्याम निगडकरसह अन्य तीन अनोळखी इसमांचा उल्लेख आहे.

पोलिसांनी या प्रकरणी चार अनोळखी आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे. सीसीटीव्ही फूटेजच्या आधारे या चार मारेकऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे समजते. परंतु आरोपीला ताब्यात घेतल्याची माहिती आहे. पोलीस हल्लेखोरांच्या मोबाईलच संभाषण (सीडीआर) काढून तपास करतील. त्यात आ.शेळके यांचे नाव आले तर त्यांच्या अडचणी वाढणार आहे.

bottom