संतोष रावत गोळीबार प्रकरणातील आरोपीची नार्कोटेस्ट करा – विजय वडेट्टीवार

आरोपीची नार्कोटेस्ट करा - विजय वडेट्टीवार

1837

News34 chandrapur

चंद्रपूर – चंद्रपूर जिल्ह्यातील मूल शहरात 11 मे च्या रात्री साडे नऊ वाजे दरम्यान cdcc बँकेचे अध्यक्ष संतोष रावत यांच्यावर झालेल्या गोळीबार हल्ल्याने राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली होती.

गोळीबार झाल्यावर अज्ञात आरोपी मोकाट होते, संतोष रावत हे कांग्रेसचे नेते व मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष आहे, त्यांच्यावर कुणी असा हल्ला करीत असतील तर राजकीय क्षेत्रातील अनेक व्यक्तींच्या जीवाला सुद्धा भविष्यात धोका उदभवू शकतो. अशी शक्यता राजकीय वर्तुळात वर्तविल्या गेली होती.

आरोपीना लवकर अटक करावी यासाठी आमदार माजी पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी आक्रमक भूमिका घेत प्रशासनाला 25 मे पर्यंत अल्टीमेटम दिला, जर आरोपी 25 मे च्या आत पकडल्या गेले नाही तर जिल्हा प्रशासनाला घेराव करणार असा इशारा वडेट्टीवार यांनी दिला होता.

त्यांनतर पोलीस प्रशासनाने गोळीबार प्रकरणाचा तपास पोलीस उपविभागीय अधिकारी सुशीलकुमार नायक यांना दिला, त्यांनी 2 दिवसात 2 आरोपीना अटक केली, विशेष म्हणजे गोळीबार प्रकरणातील मुख्य आरोपी कांग्रेसचा एका सेल चा जिल्हाध्यक्ष निघाला, सदर हल्ला हा आर्थिक देवाणघेवाण मधून झाला अशी चर्चा आहे.

विजय वडेट्टीवार यांची भूमिका काय?

आमदार विजय वडेट्टीवार यांनी सदर प्रकरणी आपली भूमिका मांडली असून आरोपी हा कोणत्याही पक्षाचा असो पण तो गुन्हेगार आहे, त्याला अभय देण्याचा प्रश्नच नाही, पोलिसांनी लवकर आरोपीना अटक जरी केली असली तरी या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार म्हणजेच बोलविता धनी कोण याचा शोध पोलिसांनी घ्यायला हवा, अटकेत असलेल्या आरोपीची पोलीस प्रशासनाने नार्को टेस्ट करायला पाहिजे ही मागणी आम्ही पोलीस प्रशासनाला करणार, सदर प्रकरण आर्थिक देवाणघेवाण मधून घडले अशी माहिती मिळाली मात्र आरोपी असं बयान देऊन पळवाटा काढत आहे, गोळीबाराचे कारण वेगळंच आहे.

bottom