वाहनाला फॅन्सी नंबर हवा पण अर्ज कसा करायचा?

Fancy number

422

News34 chandrapur

चंद्रपूर – दुचाकी असो की चारचाकी हे वाहन घेतल्यावर प्रत्येकाना VIP क्रमांक आपल्या वाहनावर असायला हवा.
आज vip क्रमांकाची क्रेज मोठ्या प्रमाणात वाढली आहे, जगात तर अनेकांनी वाहनांच्या किमतीपेक्षा 100 पटीने महाग vip क्रमांक घेतल्याची घटना सुद्धा घडली आहे.

7 क्रमांक घेण्यासाठी वाहन मालकाने 122 कोटी रुपये मोजले होते व तो क्रमांक जगातील सर्वात महागडा क्रमांक म्हणून नोंद करण्यात आली आहे.

पण हा फॅन्सी नंबर घ्यायचा कसा?

फॅन्सी नंबरची उपलब्धता तपासण्यासाठी आधी https://fancy.parivahan.gov.in/ या सरकारी वेबसाईटवर जा.

वेबसाईट ओपन झाल्यानंतर Users Other Services वर क्लिक करा.

त्यानंतर Check fancy choice numbers availability वर क्लिक करा.

त्यानंतर Maharashtra सिलेक्ट करुन तुमचं RTO Name सिलेक्ट करा.

त्यानंतर फॅन्सी क्रमांकाचा चार्ट उघडेल, त्यापुढे त्या क्रमांकाची किमतीची माहिती असेल, तिथे तुम्ही उपलब्ध असलेले फॅन्सी नंबर आणि त्यांची किंमत दिसेल, त्यातून तुम्ही एखादा चांगला नंबर सिलेक्ट करु शकता.

bottom