चंद्रपुरात कैद्याने केली पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण

चंद्रपुरात मोठी घटना

2424

News34 chandrapur

चंद्रपूर – चंद्रपुरातील शासकीय मेडिकल महाविद्यालयात मागील आठवड्यात कारागृहातील बंदीस्ताने पोलीस कर्मचाऱ्याला झोडपल्याने एकच खळबळ उडाली होती, मारहाणीचा व्हिडीओ सध्या माध्यमांवर चांगलाच व्हायरल होत आहे.
व्हायरल झालेल्या त्या व्हिडीओ बाबत अधिक माहिती घेतली असता मारहाण करणाऱ्या बंदीस्ताला मानसिक आजार असल्याची माहिती मिळाली आहे, कारागृह प्रशासनाने त्याला उपचारासाठी शासकीय मेडिकल कॉलेज मध्ये पाठविले होते.

घटना काय?

मागील आठवड्यात बंदिस्त भूषण अनिल शालीकग्राम याला कारागृह प्रशासनाने रुग्णालयात उपचारासाठी पाठविले होते, भूषण सोबत पोलीस मुख्यालयातील पोलीस कर्मचारी अंबुलकर व काही कर्मचारी सोबत गेले होते अशी माहिती आहे.

रुग्णालयातील बंदिस्त उपचार वार्ड येथे भूषण ला आणले असता त्याचा अंबुलकर सोबत वाद झाला, वाद इतका विकोपाला गेला की भूषण ने त्याठिकाणी ठेवलेल्या झाडू ने अंबुलकर ला शिवीगाळी करीत मारहाण करण्यास सुरुवात केली.
याबाबत सध्या पोलीस प्रशासनाने तक्रार दिली नसल्याची माहिती पुढे आली आहे, पोलीस कर्मचारी त्यावेळी मद्यधुंद अवस्थेत असल्याची चर्चा रंगली होती.
भूषण शालीकग्राम हा राजोली तालुका मूल येथील रहिवासी असून त्याच्यावर दुचाकी चोरीचा आरोप आहे.
मात्र या घटनेमुळे पोलीस प्रशासनावर चांगलीच नामुष्की ओढावली आहे.
bottom