संधीचा लाभ घ्या अन्यथा कारवाईला तयार रहा – चंद्रपूर महानगरपालिका

सुवर्णसंधी चा लाभ घ्या अन्यथा कारवाईला तयार रहा

3117

News34 chandrapur

चंद्रपूर   –  गुंठेवारी विकास अंतर्गत मौजा वडगाव प्रभागातील १५ तर देवई -गोविंदपुर रैयतवारी प्रभागातील २ अभिन्यास मंजूर झाले असुन सदर सर्व्हे नंबर मधील भुखंड / बांधकाम धारकांनी लवकरात लवकर भुखंड / बांधकाम नियमित करून घ्यावे अन्यथा सदर बांधकामे अनधिकृत समजण्यात येऊन त्यावर कारवाई करण्याचे निर्देश आयुक्त तथा प्रशासक विपीन पालीवाल यांनी दिले आहेत.

महाराष्ट्र गुंठेवारी विकास ( नियमाधीन करणे, श्रेणीवाढ व नियंत्रण ) अधिनियम २००१ अंतर्गत मौजा वडगाव प्रभागातील सर्वे नं ५२/१,५२/२, ४५/१ क, १६/१ पैकी, १५/१ अ, १८, ८१/३, १८ पैकी, ४५/१ अ, १६/१ व १७,४२,५३,४४/१,५१,४९ पैकी, १५/१ ब तसेच देवई -गोविंदपुर रै. १०७/५६ अ,१०७/१ क पैकी चे अभिन्यास मंजुर झालेले आहेत.

याआधी मनपातर्फे सर्व भुखंड / बांधकाम धारकांना फोनद्वारे,बॅनर,नोटीस तसेच प्रत्यक्ष संपर्क साधुन आवश्यक त्या कागदपत्रांची माहीती देण्यात आली होती तसेच ज्यांनी अर्ज सादर केले होते त्यांना अर्जातील त्रुटी संबंधीची माहीती देऊन मंजुरी घेण्यास सांगण्यात आले होते, मात्र अजूनही परवानगी घेण्यात आलेली नाही. सदर सर्व्हे नंबर मध्ये मोठ्या प्रमाणात भुखंड/बांधकामे आहेत. यातील काही मोजक्या लोकांनीच महानगरपालिकेकडुन परवानगी घेतली आहे.

गुंठेवारी प्रक्रिया अमंलबजावणीसाठी मुदत ३१ मार्च २०२४ पर्यंत करण्यात आलेली आहे. भुखंड / बांधकाम धारकांकडुन मंजुरीसाठी अर्ज घेणे,त्रुटींची पूर्तता करण्याची कारवाई करून मंजुरी देण्याची प्रक्रिया मनपा नगर रचना विभागामार्फत सुरु आहे. तेव्हा सर्वांनी १ महिन्याच्या आत अर्ज सादर करावे,त्रुटींची पूर्तता करून मंजुरी घ्यावी अन्यथा बांधकाम निष्कासनाची कारवाई करण्यात येणार आहे.

गुंठेवारी संदर्भात आढावा बैठक मनपा स्थायी समिती सभागृहात आयोजीत करण्यात आली होती याप्रसंगी सहायक संचालक नगररचना सुनील दहीकर, नगररचनाकार राजू बालमवार, सहायक नगररचनाकार सारिका शिरभाते,राहुल भोयर,क्रेडाईचे अध्यक्ष संतोष कोलेट्टीवार तथा इतर सदस्य , प्रॅक्टिसिंग आर्किटेक्टस अँड इंजिनिअर्स असोसिएशनचे प्रतिनिधी तसेच नोंदणीकृत आर्किटेक्ट व अभियंता उपस्थीत होते.

bottom