भीषण अपघात : बस समोर अचानक दुचाकी आली आणि….

बस व दुचाकींचा भीषण अपघात

1577

News34 chandrapur

राजुरा/गडचांदूर – राजुरा तालुक्यातील पांढरपौनी जवळ आज 2 मे ला भीषण अपघात झाला, या अपघातात 2 जणांचा जागीच मृत्यू झाला. Fatal accident in chandrapur

सायंकाळी 6 वाजता 31 वर्षीय संदीप सिंह व त्याचा सहकारी दुचाकीने पांढरपौनी येथे परत येत होते, मात्र वाटेत बस क्रमांक MH07C9538 ही पालगाव च्या दिशेने निघाली होती. Msrtc bus

दुचाकीने दोघे जात असताना त्यांनी अचानक वळण घेतला, बस पुढे अचानक दुचाकी आल्याने बस चालकाने दुचाकी स्वारांना वाचविण्याचा प्रयत्न केला मात्र दुचाकी थेट बस खाली आल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाला.

सदर अपघातात बस चालकाने प्रसंगावधान दाखविण्याचा प्रयत्न करीत ब्रेक मारला मात्र बस रस्त्याच्या खाली उतरत नाल्यात धडकली, बस मधील सर्व प्रवासी सुरक्षित होते मात्र दुचाकी स्वार जागीच ठार झाले. Road accident

घटनेची माहिती मिळताच पोलिस तात्काळ घटनास्थळी पोहचत मृतदेहाला बाहेर काढले, दुचाकी स्वारांचे मृतदेह राजुरा रुग्णालयात पाठविण्यात आले.

bottom