महावितरणच्या चंद्रपूर परिमंडळातील थकबाकी पोहचली 486 कोटींच्या घरात

वीज ग्राहकांची थकबाकी 486 कोटी

226

News34 chandrapur

 

चंद्रपूर – महावितरणच्या उत्पन्नाच्या सुमारे ८० टक्के रक्कम वीज खरेदीवर खर्च होत असल्याने अखंड वीजपुरवठा चालू ठेवण्यासाठी वीजबिलांचे उत्पन्न हा एकमेव उपाय आहे. त्यामुळे घरगुती, औद्योगिक, व्यावसायिक व कृषिग्राहक अशा सर्व ग्राहकांनी वीजबिले भरून सहकार्य करावे, असे कळकळीचे आवाहन मुख्य अभियंता श्री. सुनिल देशपांडे यांनी केले आहे. Electricity bill arrears

वसुलीसाठी कर्मचारी व अधिकारी मैदानात उतरले आहेत व वेगवेगळया चमूं यासाठी तयार करण्यात आल्या असून दोन्ही जिल्हयाच्या कानाकोपऱ्यात विजबिल वसुलीसाठी वीजपुरवठा ख्ंडीत करण्याची कारवाई पार पाडत आहेत. मार्च व एप्रिल या दोनच महिण्यात एकूण ३ हजार ९६८ थ्‍कबाकीदारांचा वीजपुरवठा तात्पुरता व कायमस्वरूपी ख्ंडीत करण्यात आला. तर कायमस्वरूपी वीजपुरवठा ख्ंडीत ग्राहकांकडे वीजपुरवठा ख्ंडीत केला असतांनाही क्रॅास व्हेरिफिकेशन दरम्यान बेकायदेशीर वापर आढळला त्यामुळे दंड व वीजचोरीचे बिल देण्यात आले आहे व ते न भरल्यास त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येणार आहे.

चंद्रपूर परिमंडळातील थकबाकी

चंद्रपूर व गडचिरोली जिल्हयातील एकत्रित- घरगुती ग्राहकांची थकबाकी ४३ कोटी ७३ लाख, तर वाणिज्यिक- १० कोटी ८९ लाख, औदयोगिक – ३ कोटी ३८ लाख, ग्रामीण व शहरी पाणीपुरवठा – २ कोटी ६६ लाख , सरकारी कार्यालये अधिक ईतर ग्राहकांची थकबाकी – ४ कोटी ९४ लाख (सरकारी कार्यालये- २ कोटी८२ लाख) ग्रामिण व शहरी पथदिव्यांची थकबाकी – १२५ कोटी ६९ लाखाच्या घरात पोहेाचली आहे तसेच कृषिपंपांची थकबाकी ही २९५ कोटी ४१ लाखाच्या घरात पोहेचली आहे. अशा एकंदरीत ४८६ कोटी ६९ लाखाच्या थकबाकीचा डोंगर चंद्रपूर परिमंडळात उभा झाला आहे.

जिल्हानिहाय थकबाकी

चंद्रपूर जिल्हयातील घरगुती ग्राहकांची थकबाकी ३२ कोटी ४९ लाख, तर वाणिज्यिक – ८ कोटी ८६ लाख, औदयोगिक – २ कोटी ४१ लाख, ग्रामीण व शहरी पाणीपुरवठा – २कोटी२१ लाख , सरकारी कार्यालये व ईतर ग्राहकांची थकबाकी २ कोटी ४५ लाख(सरकारी कार्यालये- १ कोटी २७ लाख), ग्रामिण व शहरी पथदिव्यांची थकबाकी ६५ कोटी ८१ लाखाच्या घरात तसेच कृषिपंपांची थकबाकी ही २०३ कोटी ५१ लाखाच्या घरात पोहेाचली आहे. अशी एकंदरीत ३१७ कोटी ७४ लाखाच्या थकबाकीचा डोंगर चंद्रपूर जिल्हयात उभा झाला आहे.

गडचिरोली जिल्ह्याची थकबाकी

गडचिरोली जिल्हयातील घरगुती ग्राहकांची थकबाकी ११ कोटी २४ लाख, तर वाणिज्यिक २ कोटी ११ लाख, औदयोगिक ९६ लाख, ग्रामीण व शहरी पाणीपुरवठा ४५ लाख , सरकारी कार्यालये व ईतर ग्राहकांची थकबाकी २ कोटी ४९ लाख (सरकारी कार्यालये- ९९ लाख) ग्रामिण व शहरी पथदिव्यांची थकबाकी ५९ कोटी ८८ लाखाच्या घरात तसेच कृषिपंपांची थकबाकी ही ९१ कोटी ९० लाखाच्या घरात पोहेचली आहे. अशी एकंदरीत १६८ कोटी ९५ लाखाच्या थकबाकीचा डोंगर गडचिरोली जिल्हयात उभा झाला आहे.

वीज भरणा आता घरी बसून करा

वीज बिलांचा भरणा करण्यासाठी महावितरणद्वांरा ग्राहकांना पर्यावरणपुरक ऑलाईन पेमेंट, मोबाईल अॅप, गुगल पे, पेटीएम या यासारख्या ग्राहकाभिमुख सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या असून नियीमत ग्राहकांचा प्रतिसादही या सुविधांना चांगल्याप्रकारे लाभत असल्याचे चित्र आहे. लघुदाब वर्गवारीतील सर्व वीजग्राहकांनी घरबसल्या महावितरणची वेबसाईट, मोबाईल ऍप किंवा इतर ऑनलाईन पर्यांयाद्वारे वीजबिलांचा भरणा करून सहकार्य करावे.

दोन्ही जिल्हयामधिल, घरगुती, वाणिज्यिक, औदयोगिक, सरकारी कार्यालये, सार्वजनिक पाणिपुरवठा योजना व पथदिव्यांची तसेच कृषिग्राहकांनी महावितरणची आर्थिक स्थिती समजून घेत थकबाकीचा भरणा करुन महावितरणला सहकार्य करावे असे कळकळीचे आवाहन मुख्य अभियंता श्री. सुनिल देशपांडे यांनी केले आहे.

bottom