चंद्रपुरातील हा पूल वर्धा नदीत गेला वाहून

पुल कोसळला

2013

News34

चंद्रपूर/घुग्गुस – चंद्रपूर जिल्ह्याला अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला असून 3 मे ला चंद्रपूर व यवतमाळ ला जोडणारा पूल पाण्यात वाहून गेला. Unseasonal rain in chandrapur

मुंगोली येथे वेकोली च्या पुलाचा काही भाग कोसळण्याच्या मार्गावर असल्याने वेकोली ने त्याच्या दुरुस्तीचे काम सुरू केले, यवतमाळ जिल्ह्याकडे जाणाऱ्या वाहनांची गैरसोय होऊ नये यासाठी वेकोली ने पर्यायी मार्गाचे तात्पुरत्या स्वरूपात बांधकाम केले. Bridge collapsed

मात्र जिल्ह्यात मागील आठवडाभरापासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे वेकोली ने निर्माण केलेला कच्चा रस्ता वर्धा नदीत वाहून गेला, आता चंद्रपूर वरून यवतमाळ जिल्ह्यात जाणाऱ्या वाहनांना फिरत जावे लागत आहे.

वर्धा नदीचा पाण्याचा प्रवाह अचानक वाढल्याने सदर कच्चा मार्ग नदीत वाहून गेला. वेळीच सदर घटना घडल्याने कसलीही हानी झाली नाही.

bottom