चंद्रपूर जिल्ह्यातील या रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय

बघा हा रस्ता

348

News34 chandrapur

 

कोरपना – वणी – गडचांदूर राज्य महामार्ग क्रमांक ३१७ वरील दालमिया सिमेंट गेट ते वनोजा जवळील पैनगंगा नदी पुल पर्यंतच्या रस्त्याची अत्यंत दुरावस्था झाली आहे. त्यामुळे वाहनधारकांना तारेवरची कसरत करत आपली वाहने चालवावी लागते आहे. मात्र याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होते आहे. या रस्त्याची त्वरित दुरुस्ती न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा वनोजा ग्रामपंचायतचे माजी सरपंच भास्कर मत्ते व ग्रामस्थांनी दिला आहे. Poor road condition

बांधकाम विभागाच्या नियोजनात
सावंगी -सानेफळ -राळेगाव -खैरी वडकी – वणी – नांदा फाटा – गडचांदूर असा हा राज्य महामार्ग आहे. परिसरातील सिमेंट कोळसा, गिटी खदान आदी उद्योगामुळे या मार्गावरून मोठ्या प्रमाणात अवजड वाहतूक होते. क्षमतेपेक्षा अधिक वाहनाचा भार सद्यस्थितीतील निर्मित रस्त्याला सोसेनासा झाला आहे. त्यामुळे डांबरीकरणानंतर दोन दिवसातच रस्ता पूर्णता उखडला जातो आहे. त्या दृष्टीने या रस्त्याचे संपूर्ण काँक्रिटीकरण होणे गरजेचे आहे. Wani – Gadchandur State Highway

सद्यस्थिती तील रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले असल्याने रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता अशी अवस्था या मार्गाची झाली आहे. या परिसरातील वनोजा, झोटिंग, पाथरी, कळमना, परमडोह, शिंदोला, कुर्ली , येनाडी , नारडा आदी गावातील नियमित जाणाऱ्या ग्रामस्थांना नाहक त्रास सहन करावा लागतो आहे. तसेच वनोजा गावाकडे जाणाऱ्या पोचमार्गाची दैना अवस्था झाली आहे. त्यामुळे ग्रामस्थांना प्रवास करताना मोठया अडचणींचा सामना करावा लागतो आहे.
येत्या पंधरा दिवसात या दोन्ही रस्त्याची दुरुस्ती न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा मत्ते व परिसरातील ग्रामस्थांनी यांनी दिला आहे.

bottom