प्रमिला ची मारेकरी वनविभागाच्या ताब्यात

हल्लेखोर बिबट मादी बछड्यासहित जेरबंद

813

News34 chandrapur

 

सावली : वनपरिक्षेत्रांतर्गत येत असलेल्या व्याहाड खुर्द उपवनपरिक्षेत्रातील सामदा बूज वन बीटमध्ये येणाऱ्या वाघोली बुटी शिवारात शनिवारी बिबट्याने हल्ला करून एका महिलेला ठार केल्याची घटना घडली होती. त्याच रात्री वन विभागाने त्या बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वैनगंगा नदीकाठावरील डॉ. रूढे यांच्या फार्महाऊस जवळ शंभर मीटर अंतरावर पिंजरे लावून ठेवले असता, रात्रीच्या सुमारास हल्लेखोर मादी बिबट व तिचे दोन बछडे जेरबंद झाले. Leopard attack

शनिवारी बिबट्याने केली महिलेची शिकार

विशेष म्हणजे, वाघोली बुटी परिसरात वाघ व बिबट्याने महिनाभरात चांगलाच धुमाकूळ घातला होता. २० दिवसांपूर्वी याच परिसरात वाघाने ममता बोदलकर या महिलेला ठार केले होते. तर शनिवारी वाघोली बुटी येथील प्रेमिला रोहणकर या शनिवारी शेतात काम करण्यासाठी गेल्या असताना याच मादी बिबट्याने तिच्यावर हल्ला करून ठार केले.

या घटनेनंतर शेतात काम करणारे ५० ते ६० जण धावत आले. त्यांनी बिबट्याला पळविण्याचा प्रयत्न केला. काही वेळाने बिबट्याने धूम ठोकली. विशेष म्हणजे, घटनेनंतर माजी मंत्री आमदार विजय वडेट्टीवार यांनी वाघोली बुटी येथे जाऊन रोहणकर कुटुंबियांची भेट घेत बिबट्याला पकडण्याची सूचना वन अधिकाऱ्यांना दिली होती. शनिवारी रात्रीच वन विभागाने त्या बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वैनगंगा नदीकाठावरील डॉ. रूढे यांच्या फार्महाऊसजवळ शंभर मीटर अंतरावर पिंजरे लावून ठेवले होते. रात्रीच्या सुमारास हल्लेखोर मादी बिबट व तिचे दोन बछडे पिंजऱ्यात जेरबंद झाले.

वाघाला ठार करा

या घटनेनंतर माजी पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी महिलेवर हल्ला करणाऱ्या वाघाला ठार करण्याचे आदेश वनविभागाने द्यावे अशी मागणी केली होती, भविष्यात या घटना वाढेल असा अंदाज त्यांनी व्यक्त केला होता.

bottom