वडेट्टीवार पालकमंत्री असतांना त्यांनी चंद्रपूर जिल्ह्यात काय काम केलं? – खासदार धानोरकर यांचा सवाल

1095

News34 chandrapur

चंद्रपूर – देशातील नागरिकांना जोडण्यासाठी कांग्रेस नेते राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा काढली, या यात्रेत लाखो नागरिकांनी राहुल गांधी यांना चांगला प्रतिसाद दिला, मात्र भारत जोडो यात्रेनंतर चंद्रपूर जिल्ह्यात स्थानिक नेते कांग्रेस तोडण्यात पुढे असल्याचे चित्र समोर आले आहे.

देशात एकीकडे कांग्रेस भाजप विरोधात लढा देत आहे, मात्र चंद्रपूर जिल्ह्यात कांग्रेस भाजपसोबत हातमिळवणी करीत निवडणूका लढवीत आहे, नुकत्याच झालेल्या बाजार समिती निवडणुकीत कांग्रेस विरुद्ध कांग्रेस असे चित्र बघायला मिळाले.

एकीकडे कांग्रेस खासदार बाळू धानोरकर तर दुसरीकडे माजी पालकमंत्री आमदार विजय वडेट्टीवार यांचा गट एकमेकाविरोधात निवडणुकीत उभे राहिले, मात्र धानोरकर गटाला यामध्ये पराभव मिळाला.

या निवडणुकी नंतर पुन्हा कांग्रेस पक्षातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे, यावर खासदार बाळू धानोरकर यांनी प्रतिक्रिया देत वडेट्टीवार यांना आव्हान दिलं की तुमच्यात धमक असेल तर चंद्रपूर लोकसभा लढवून दाखवावी, आम्ही घरी बसू व पक्षाचे कार्य करू.

कांग्रेस पक्षाचे आमदार खासदार निवडून आल्यावर वडेट्टीवार यांना मंत्रिपद मिळालं हे विसरता कामा नये, खासदार म्हणून मी स्वतः सक्षम आहो, मी 12 दिवसात प्रत्येक विधानसभा क्षेत्रात आघाडी घेत लोकसभा जिंकली.

वडेट्टीवार जेव्हा पालकमंत्री बनले तर किती कांग्रेस आमदारांना त्यांनी निधी दिला? किती कार्यकर्त्यांचे कामे त्यांनी केली, पक्षाला मजबूत केलं का? जे त्यांनी सांगायला हवं.

स्थानिक निवडणुकीत कांग्रेस पक्षाने भाजपसोबत हातमिळवणी केल्याने कांग्रेसचे अनेक कार्यकर्ते नाराज झाले आहे, येणाऱ्या नगरपालिका, महानगरपालिका, लोकसभा व विधानसभा निवडणुकीत चंद्रपुरातील कांग्रेस एकमेकांविरोधात लढत कांग्रेसला हरविल्याशिवाय राहणार नाही.

 

bottom