वेकोलीच्या ब्लास्टिंगमुळे बाप-लेकीचा मृत्यू

Wcl blasting news

News34

नागपूर – कोळसा काढण्यासाठी वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेड द्वारे करण्यात येणाऱ्या ब्लास्टिंग मुळे आज सोमवारी बाप-लेकीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली.

कमलेश कोटेकर व यादवी कोटेकर असे मृतकाचे नाव आहे, सदर घटना जिल्ह्यातील कान्द्री-कन्हान येथे घडली.

कान्द्री-कन्हान भागात वेकोलीद्वारे टाकण्यात आलेल्या मातींमुळे मोठी टेकडी निर्माण झाली आहे, या टेकड्यामुळे वेकोली द्वारे करण्यात येणाऱ्या ब्लास्टिंग चे हादरे हरिहर नगर भागात मोठ्या प्रमाणात जाणवितात.

हरिहर नगर भागात वेकोलीच्या ब्लास्टिंगमुळे अनेक घरे क्षती ग्रस्त झाली आहे, याच भागात कोटेकर कुटुंब वास्तव्यास आहे, सोमवारचा दिवस असल्याने सलून बंद असते, त्यामुळे कमलेश कोटेकर हा घरी होता. वेकोलीच्या ब्लास्टिंगमुळे कोटेकर यांचं घर मोठ्या प्रमाणात क्षतीग्रस्त झालेले होते. Amazon वर खरेदी करा मोबाईल, लॅपटॉप, हेडफोन अगदी माफक दरात

कमलेश यांची 5 वर्षीय मुलगी केजी 2 मध्ये शिकत होती, शाळा सुटल्यावर दुपारी ती घरी आली होती, बाप-लेकीने मिळून जेवण केल्यावर दोघेही आराम करीत होते.

कमलेश यांचा लहान मुलगा आजीसोबत घराबाहेर खेळत होता, कमलेश यांची पत्नी शेतावर गेली असताना दुपारी 1 वाजताच्या सुमारास वेकोलीने ब्लास्टिंग केली, ब्लास्टिंगमुळे कमलेश यांचं घर जमीनदोस्त झाले, परिसरातील नागरिक मदतीला धावले मात्र कमलेश व त्याची मुलगी यादवी यांचा तोपर्यंत मृत्यू झाला होता.

बाप-लेकीच्या करून अंताने नागरिक संतापले त्यांनी वेकोली कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले, यावेळी माजी आमदार मल्लिकार्जुन रेड्डी व नागरिक सामील झाले होते.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!