3 शिक्षकांचा धरणात बुडून मृत्यू

News34

गोंदिया – 15 ऑगस्टला स्वतंत्र दिनाचे औचित्य साधत अनेकजण सहलीला जातात मात्र कधी ही सहल शेवटची ठरणार याचा कोबी अंदाज नसतो, गोंदिया जिल्ह्यातील खाजगी शिकवणी वर्गात शिक्षक असलेले 3 शिक्षकांचा धरणात बुडून मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली.

हे तिन्ही शिक्षक गोंदिया, भिलाई व उत्तर प्रदेश राज्यातील रहिवासी होते, 15 ऑगस्ट व पारशी नववर्षाची सुट्टी असल्याने एन. मिश्रा, अरविंद व अतुल कडू हे गोंदियातील सिद्धिविनायक शिकवणी वर्गात शिक्षक आहे.

2 दिवसांची सुट्टी असल्याने आपण सहलीला जाऊ असा प्लॅन झाला होता, भिलाई येथील शिक्षक मित्राच्या आमंत्रणावर राजनांदगाव येथील मांगता धरणावर चार शिक्षक सहलीसाठी गेले होते.

मात्र खोल पाण्याचा अंदाज न आल्याने 4 पैकी 3 शिक्षक पाण्यात बुडाले यामध्ये तिघांचा मृत्यू झाला, आपत्ती व्यवस्थापन बचाव पथकाने 3 शिक्षकांचे मृतदेह बाहेर काढले, मिश्रा, अरविंद सर व अतुल कडू या तिघांचा यावेळी मृत्यू झाला.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!