News34
चंद्रपूर – चांद्रयान 3 चे विक्रम लँडर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीरीत्या उतरले आहे, या भागावर चांद्रयान उतरविणारा भारत देश पहिला ठरला आहे. तर चंद्राच्या कोणत्याही भागावर हे वाहन उतरविणारा भारत चौथा देश ठरला आहे.
यानंतर सर्वजण विक्रम लँडर मधून प्रज्ञान रोव्हर बाहेर येण्याची वाट सध्या देशवासी बघत आहे, धूळ स्थिरावल्यावर विक्रम आणि प्रज्ञान रोव्हर एकमेकांचे फोटो काढून पाठवतील.
चांद्रयान 3 च्या यशस्वी लँडिंग या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वर्चुअली सामील झाले होते, लँडिंग नंतर पंतप्रधान मोदी यांनी देशवासियांना संबोधित केले.