वाघाचा गुराख्यावर हल्ला, आणि गुराख्याने वाघाच्या दिशेला भिरकावली काडी आणि…

News34 chandrapur

चिमूर – सोमवारी चैती बिट कोलारा कोअर वनक्षेत्राजवळ दबा धरून बसलेल्या वाघाने गुराख्यावर हल्ला करीत जखमी केल्याची घटना घडली.

 

नेहमीप्रमाणे कोलारा निवासी गुराखी 57 वर्षीय शंकर दोने हे गुरांना चारासाठी जंगल परिसरात गेले होते, कोलारा गेट परिसरातून शंकर जात असताना त्याठिकाणी झुडपात वाघ दबा धरून बसला होता, संधी मिळताच वाघाने शंकर वर हल्ला केला.

 

अचानक झालेल्या या हल्ल्यात शंकर घाबरला मात्र हिंमत न हरता शंकर ने जवळ असलेल्या काडीने वाघावर प्रहार केला, काडीचा मार बसल्यावर वाघाने जंगलात धूम ठोकली.

 

मात्र या हल्ल्यात शंकरच्या शरीरावर जखमा झाल्या, काही वेळात परिसरातील गुराख्यानी शंकर च्या दिशेने धाव घेत त्याला तात्काळ उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.

 

घटनास्थळी वनपरिक्षेत्र अधिकारी एस एस डुबे यांनी भेट दिली. महिला वनरक्षक बी बी सोयाम , गेट व्यवस्थापक अविनाश गणवीर व गावकर्यांनी दवाखान्यात भेट दिली वन्यजीव कोलारा कोअर यांनी तातडीची मदत जखमीला दिली. जखमीला पूढील उपचारासाठी चंद्रपूर येथे रेफर करन्यात आले.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!