News34
नागभीड – 1 सप्टेंबर ला सकाळच्या सुमारास नागभीड पुढे नवखडा जवळ बस व ट्रक चा भीषण अपघात झाला या अपघातात 13 प्रवासी सहित 1 गंभीर जखमी झाला.
शुक्रवारी सकाळी 7 ते साडेसात दरम्यान ब्रह्मपुरी ते अमरावती बस क्रमांक एम एच १३ सी यु ८३३७ निघाली असता नागभीड समोर 1 किलोमीटर अंतरावर बस व ट्रक ची समोरासमोर धडक झाल्याने ट्रक चालक हा गंभीर जखमी झाला.
अपघात इतका भीषण होता की बस व ट्रक चा समोरील भाग पूर्णतः चेंदामेंदा झाला, अपघात झाल्यावर ट्रक चालक हा तब्बल 1 तास अडकून राहिला, प्रशासनाने तात्काळ जेसीबी च्या साहाय्याने ट्रक चालकाला बाहेर काढले, मात्र चालकाचे दोन्ही पाय निकामी झाल्याने त्याला नागपूर रुग्णालयात पुढील उपचारासाठी नेण्यात आले.
बस चालक, बसवाहक, ट्रक ड्रायव्हर यासोबत प्रवासी जखमी झाल्याने त्यांना ग्रामीण रुग्णालय नागभीड येथे दाखल करण्यात आले तर ट्रक ड्रायव्हरला नागपूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले.
पुढील तपास नागभीड पोलीस स्टेशन येथील ठाणेदार यांच्या मार्गदर्शनाखाली साखरे साहेब हे करीत आहेत.